Share

दिडशे रुपयांच्या शालेय पोषण आहारसाठी हजार रुपयांचे बँक खाते सक्तीचे

Published On: 

औरंगाबाद : इयत्ता १ ते ८ पर्यंतच्या शालेय विद्याथ्र्यांना शिक्षण विभागाकडून दिडशे रुपयांसाठी हजार रुपयांचे बँक खाते सक्तीचे केले आहे. उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहार विद्याथ्र्यांना प्रत्यक्ष वितरित न करता त्याऐवजी आहाराचे अनुदान थेट विद्याथ्र्यांचा बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे केवळ शंभर रुपयांच्या अनुदानासाठी विद्याथ्र्यांना हजार रुपयांचे बँक खाते उघडावे लागेल. हा निर्णय पालकांना परवडणारा नसल्याने आता याचा विरोध होत आहे.

शालेय विद्याथ्र्यांना २०२१ च्या उन्हाळी सुट्टीतील धान्य वाटपाची रक्कम थेट विद्याथ्र्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे परिपत्रक प्राथमिक शिक्षण संचालकांकडून नुकतेच जारी करण्यात आले आहे. विविध शासकीय योजना व शिष्यवृत्ती घेणाऱ्या विद्याथ्र्यांचे बँक खाते आहे. परंतु हे प्रमाण फार अत्यल्प असल्यामुळे अनेक विद्याथ्र्यांना नवे बँक खाते उघडावे लागेल. सुट्टीतील ३५ दिवसांचे अनुदान पाहिली ते पाचवीच्या विद्याथ्र्यांकरिता १५६ रुपये तर सहावी ते आठवीच्या विद्याथ्र्यांकरिता २३४ रुपये ठरणार आहे.

कोरोना संकटामुळे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतांना, अशा परिस्थितीत शासनाने हा निर्णय घेतला असल्याने पालकांच्यासुद्धा चिंता वाढल्या आहेत. त्यामुळे किमान दीडशे रुपयांच्या निधीसाठी एक हजार रुपये भरून बँक खाते उघडणे अनेक पालकांना परवडणारे नसून हा निर्णय शासनाने रद्द करावा, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!