पुणे : खाजगी वाहतूकदारांकडून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भाडे दराच्या दीडपटीपेक्षा जास्त भाडेदर आकारल्यास पुराव्यासह तक्रार नोंदवता येणार आहे. सणउत्सवाच्या कालावधीत खाजगी प्रवासी बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून अवाजवी जादा भाडे आकारण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे भाडेदर विचारात घेवून खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति किमी भाडेदराच्या 50 टक्के पेक्षा अधीक राहणार नाही अशाप्रकारे भाडे आकारणी करण्याचे निर्देश खाजगी वाहतुकदारांना देण्यात आले आहेत.
खाजगी वाहतूकदारांकडून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भाडे दराच्या दीडपटीपेक्षा जास्त भाडेदर आकारल्यास पुराव्यासह dycommr.enf2@gmail.com व mh14@mahatranscom.in या ईमेल पत्त्यावर तक्रार नोंदवावी. अवाजवी भाडे आकारणी करणाऱ्या खाजगी वाहतूकदारावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकांना आदेश देण्यात आल्याचे पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी कळविले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांनी वानखेडेंचा ‘स्वीट कपल’ फोटो केला ट्वीट; दिला ‘हा’ इशारा
- राज्यपाल मलिक यांनी भाजपची ‘झाकली मूठ’च उघड केली; संजय राऊतांचा टोला
- लवकरच वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा सादर करणार; नवाब मलिकांचा इशारा
- विविध मागण्यांसाठी आरोग्यमंत्री टोपे यांच्या निवासस्थानावर आशा व गट प्रवर्तकांचा मूक मोर्चा
- ‘कोरोना काळात एस.टी कर्मचाऱ्यांनी उत्तम सेवा बजावली; राज्य सरकार त्यांच्या पाठीशी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

