Share

कापसाच्या पैशासाठी शेतकऱ्याची थेट कृषी मंत्र्याकडे तक्रार

Published On: 

बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई येथे भारतीय कपास निगम लिमिटेड म्हणजेच सीसीआयमार्फत शासकीय हमीभावाने कापूस खरेदी 18 नोव्हेंबर 2020 पासून सुरू आहे. मात्र, शासकीय कापूस खरेदी केंद्रावर घातलेल्या कापसाचे पैसे काही शेतकऱ्यांना अजूनही मिळाले नाहीत. त्यामुळे कापूस खरेदीचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांनी थेट कृषी मंत्र्याकडे इमेलद्वारे तक्रार केली आहे.

खरेदी केंद्र सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी रुख्मिनबाई काशिनाथ जाधव यांच्या नावाने कापूस घालण्यात होता. चार दिवसानंतर कापूस घातल्याची ताकपट्टी घेतली असता त्यावर आधार नंबर, कापसाचे वजन, वाहनाचा क्रमांक हे बरोबर आले होते. मात्र, संबंधित शेतकऱ्यांचे नाव, खाते नंबर, बँक आयएफएससी कोड चुकीचा आला होता. याची विचारपूस केली असता केंद्र प्रमुख मंगेश किटकुले यांनी हे ऑनलाईन करताना चुकले असून तुम्ही पूर्ण कागदपत्रे द्या पैसे मिळतील असे सांगितले.

परंतु तीन महिन्यानंतरही पैसे खात्यावर जमा झाले नाहीत. संबंधित शेतकऱ्यांनी चार वेळेस गेवराई येथील कार्यालयात कागदपत्रे जमा केली आहेत. परंतु अजूनही तेथील कर्मचारी कागदपत्राची मागणी करत आहेत. यामुळे रुख्मिनबाई यांचा मुलगा नवनाथ जाधव यांनी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे इमेलद्वारे तक्रार केली आहे.

सीसीआय कार्यालयात चकरा मारून आणि कागदपत्रे देऊनही कापसाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. सीसीआय कार्यालय औरंगाबाद येथेही याबाबत तक्रार करण्यात आली होती. मात्र, तिकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे त्यांनी आता कृषी मंत्र्यांकडे तक्रार केली आहे. तर शेतकऱ्यांचे पैसे जमा करण्यास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची देखील मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!