मुंबई : देशात सद्या सुरू असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळं आरोग्य व्यवस्थेवरील ताणही वाढत चालला आहे. यामुळे वैद्यकीय सुविधांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. अशी परिस्थिती असताना दुसरीकडे देशातील ९० टक्के डॉक्टर्स याचा गैरफायदा घेत आहेत असा आरोप प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आणि अभिनेता सुनील पाल याने केला होता. इतकंच काय तर हे डॉक्टर्स देवदूत नाहीत राक्षस आहेत असं तो म्हणाला होता. या वादग्रस्त विधानामुळं त्याच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सुनील पाल डॉक्टरांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत असोसिएट ऑफ मेडिकल कंसल्टंटच्या अध्यक्षा सुष्मिता भटनागर यांनी अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सुनीलला कठोर शिक्षा करावी अशी विनंती देखील त्यांनी यावेळी केली आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुनील म्हणाला की, “देशातील ९० टक्के डॉक्टर्स चोर आहेत. कोरोनाग्रस्त परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत. गरीबांनाकडून लाखो रुपये उकळत आहेत. पाच रुपयांचं औषध १०० रुपयांना विकत आहेत.” मात्र त्याच्या या व्हिडीओवर काही अनेकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर त्यानं हा व्हिडीओ डिलिट करत माफी मागितली. आता याबाबत पोलीस तक्रार करण्यात आली असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे सुनीलच्या अडचणीत आता आणखी भर पडली आहे.
महत्वाच्या बातम्या
- संकट गंभीर गडकरी खंबीर; वर्ध्यातील कंपनीत रेमडेसिवीर निर्मितीला सुरुवात
- ‘पश्चिम बंगालमध्ये अराजकता, राष्ट्रपती राजवट लागू करा’, गिरीश महाजनांची मागणी
- सोलापूरकरांचा नाद खुळा! तीन लाखांचा दंड भरू पण, मास्क लावणार नाही
- इंदोरीकर महाराजांच्या अडचणी वाढल्या, आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाकडून नोटीस
- ‘कर्ज फेडण्यासाठी छोट्या कर्जदारांना जास्त वेळ द्या’, आरबीआयचे बँकांना निर्देश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

