पुणे – गेल्या काही महिन्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोकं वर काढले आणि त्यातच पेट्रोल, डिझेल सोबतच घरगुती गॅस, डाळी, खाद्यपदार्थांच्या किंमतींचे दरही आस्मानाला भिडले आहेत. यामुळे सामान्य माणूस त्रस्त झाला असून घर चालवायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित होत आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसताना आता खासगी रासायनिक खतांच्या किंमतीमध्येही सरासरी ६०० ते ७०० रूपये एवढी विक्रमी दरवाढ केली होती.
यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला होता. यासोबतच, भाजप मधील विविध नेत्यांनी देखील खत दरवाढ रद्द करावी अशी मागणी केली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खतांच्या दरात कपात केल्याचं जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारात दरवाढ झाल्यानंतरही खताची किंमत बरीच कमी केली आहे.
केंद्र शासनाने दि.22 मे 2021 रोजी सुधारित मूल्य द्रव्य आधारित अनुदान जाहीर केले आहे. यामध्ये स्फुरद या अन्नद्रव्याचे अनुदान वाढविण्यात आल्यामुळे स्फुरदयुक्त खतांच्या किंमतीमध्ये मोठया प्रमाणात घट झाली आहे. शेतकऱ्यांनी खतांच्या सुधारित अनुदानामुळे कमी झालेल्या किंमतीमध्ये खतांची खरेदी करावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सुधारित अनुदान जाहिर होण्याच्या पूर्वीच्या किंमतीत खत विक्री होत असल्यास आयुक्तालय स्तरावरील नियंत्रण कक्षामधील भ्रमणध्वनी क्र. ८४४६११७५०० व टोल फ्री क्र. १८०० २३३ ४००० या क्रमांकावर दररोज सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत संपर्क साधावा. तसेच आपल्या जिल्हयाचा नियंत्रण कक्ष, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी (पंचायत समिती) यांचेकडे तक्रार करावी, असे आवाहन आयुक्त (कृषि), धीरजकुमार यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- आसाममध्ये भाजप सरकार आणणार गो संरक्षण कायदा
- ‘मोदी सरकारच्या कुशासनामुळे म्युकरमायकोसिसचे संकट’, राहुल गांधींची टीका
- ‘कोरोनाविरोधी लढा दुबळा करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न’, प्रकाश जावडेकरांची टीका
- गंभीर! दावा ३० कोटी लसीकरणाचा, प्रत्यक्षात मात्र ४ कोटी नागरिकांना मिळाली लस
- लसीकरणाची गती वाढवण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवालांचे मोदींना चार सल्ले


