Share

आसाममध्ये भाजप सरकार आणणार गो संरक्षण कायदा

Published On: 

गुवाहाटी : आसाममधील भाजप सरकार गायींचा संरक्षणासाठी लवकरच राज्यात कायदा लागू करणार आहे. मात्र, इशान्येकडील राज्यांमध्ये गोमांसाचा खाण्यासाठी सर्रास होणारा वापर पाहता या प्रस्तावित कायदावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आसामच्या नव्या १५व्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला शनिवारी राज्यपाल जगदीश मुखी यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी सरकारची पुढील पाच वर्षांची वाटचाल कशी असेल याची रूपरेषा मांडली. राज्यपालांनी आपल्या भाषणात विधानसभेच्या पुढील अधिवेशन गो संरक्षण विधेयक मांडण्याची राज्य सरकारची योजना असल्याचे सांगितले.

‘लोक गायीचा आदर करतात, तिला पुजतात. मला आनंद होत आहे की, पुढील अधिवेशनात गो संरक्षण विधेयक सादर करण्याची माझ्या सरकारची योजना आहे. या प्रस्तावित कायद्यात गायींची राज्याबाहेर वाहतूक करण्यास पूर्णपणे बंदी असेल. कायद्याने गायीला संरक्षित प्राण्याचा दर्जा देऊन तिचे रक्षण करण्यात येईल. गायींची तस्करी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची तरतूद या कायद्यात असेल’, असे मुखी यांनी सांगितले.

मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, उत्तराखंड यांसह अनेक भाजपशासित राज्यांनी यापूर्वीच गोवंशाची कत्तल, तस्करी रोखण्यासाठी कायदा तयार केला आहे. यामध्ये आता आसामची भर पडणार आहे. पण इशान्य भारतातील लोकांच्या आहारात गोमांसचा समावेश असतो. त्यामुळे या प्रस्तावित कायद्याला आसामची जनता स्वीकारेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विरोधकांकडून या मुद्यावरून प्रादेशिक अस्मितेला हात घालून भाजपविरोधात रान पेटवण्यात येण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!