नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कोरोनाच्या नव्या विषाणूला कथितरीत्या भारताशी जोडल्याप्रकरणी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला. तसेच काँग्रेस नेत्यांकडून सातत्याने देशाचा अवमान करत कोरोनाविरोधातील लढाई कमकुवत केला जात असल्याचा आरोप त्यांनी लावला.
कोरोनाच्या संकटात काँग्रेस जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजाविण्याऐवजी नकारात्मक राजकारण करत आहे, अशी टीका भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ यांनी नव्या विषाणूचा उल्लेख ‘भारतीय कोरोना’ असा केला. जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओने अद्याप नव्या विषाणूला कोणत्याही देशासोबत जोडले नाही.
अनेक काँग्रेस नेत्यांकडून नव्या विषाणूचा उल्लेख ‘भारतीय कोरोना’ असा केला जात आहे. कमलनाथ इतक्यावरच थांबले नाहीत, तर आपली ओळख ‘माझा भारत कोरोना’ अशी होत आहे, असे वक्तव्य केले. हा सरळसरळ देशाचा अवमान असल्याचा आरोप जावडेकर यांनी केला. विरोधी बाकावर बसलेले नेते सातत्याने लोकांमध्ये संभ्रम पसरविण्याचे आणि भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
या नेत्यांनी स्वदेशी कोव्हॅक्सिनच्या मंजुरीवेळी देखील असेच केले. आता इतर देशांमध्ये कोव्हॅक्सिन लस सूचीबद्ध करण्यात आली नसल्यामुळे ही लस घेतलेल्यांना विदेशात प्रवेश दिला जाणार नाही, असा दावा केला जात आहे. मात्र, माझ्या माहितीप्रमाणे या दिशेने प्रक्रिया सुरू आहे. तसेच डब्ल्यूएचओने देखील अद्याप असा कुठलाही निर्णय घेतला नाही, असे जावडेकर म्हणाले. त्यामुळे काँग्रेस सातत्याने नकारात्मक राजकारण का करत आहे, याचे उत्तर सोनिया गांधी यांनी दिले पाहिजे. त्याचबरोबर सोनियांनी अद्याप कमलनाथ यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध का केला नाही, असा सवाल जावडेकर यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या
- गंभीर! दावा ३० कोटी लसीकरणाचा, प्रत्यक्षात मात्र ४ कोटी नागरिकांना मिळाली लस
- लसीकरणाची गती वाढवण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवालांचे मोदींना चार सल्ले
- वंचित लोक, अनाथ बालकांसाठी सुविधा मजबूत करा; केंद्राचे राज्यांना निर्देश
- पदोन्नतीतील आरक्षण नाकारणारा निर्णय रद्द करा-प्रा. जोगेंद्र कवाडे
- बोनी कपुर आणि श्रीदेवीच्या अफेयरवर अर्जुन कपुरने सोडले मौन, म्हणाला…


