Share

राणेंची संभाजी महाराजांशी तुलना, शिवसेना आमदारांची प्रमोद जठारांविरोधात तक्रार

Published On: 

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संगमेश्वरात अटक झाल्यानंतर भाजपचे सिंधुदुर्ग माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी त्यांची तुलना छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी केली. जठार यांचे हे कृत्य अत्यंत निंदनीय व छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणारे असल्याची तक्रार शिवसेना आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक यांनी पोलीस ठाण्यात केली आहे.

नारायण राणे यांना अटक केल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. जन आशीर्वाद यात्रेचे संयोजक प्रमोद जठार यांनीही यावेळी घोषणाबाजी केली होती. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांसोबत राणेंची तुलना करण्यात आली होती. या प्रकरणी रत्नागिरी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. राणेंवर अनेक आरोप आहेत. त्यांची तुलना संभाजी महाराजांशी तुलना करणं चुकीचं आहे, असं शिवसेना आमदार राजन साळवी म्हणाले.

नारायण राणे यांना अटक झाल्यावर ‘छत्रपती संभाजी महाराजांनासुद्धा याच संगमेश्वरात अटक झाली होती आणि औरंगजेबाचे राज्य संपले होते, असे वक्तव्य प्रमोद जठार यांनी केले आहे. राणे हे अनेक फौजदारी गुह्यांत आरोपी असताना त्यांची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी करणे हे निंदनीय कृत्य आहे. जठार यांनी हेतुतः आणि जाणीवपूर्वक असे करून छत्रपती संभाजी महाराजांचे अनुयायी व शिवसैनिकांच्या भावना दुखावल्याची तक्रार राजन साळवी यांनी संगमेश्वर व  रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. तर वैभव नाईक यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत चिथावणीखोर वक्तव्याबद्दल जठार यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!