औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांतर्गत शिवसेना महिला आघाडी, उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड व महालॅब यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत रक्ताच्या विविध तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते या शिबिराचे उदघाटन संपन्न झाले. रविवार ( दि. १) शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात हे शिबीर घेण्यात आले. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कोणत्याही आजारावर उपचार होण्यासाठी प्रथम आजाराचे निदान होणे आवश्यक आहे. शिवसेना महिला आघाडीने महिलांसाठी आयोजित केलेले शिबिर कौतुकास्पद असून अशा प्रकारच्या शिबिराची व्याप्ती वाढविणे गरजेचे आहे असे स्पष्ट करीत या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्य विषयक अडचणी जाणून त्यांना उपचार देण्यासाठी तसेच महिलांचे लसीकरण करण्यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी व सदस्यांनी पुढाकार घ्यावा असे अवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी केले.
यावेळी युवानेते अब्दुल समीर, नगराध्यक्षा राजश्री निकम, जि. प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे आदिंसह आशा सेविका, उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त संपूर्ण जिल्हाभरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. यात महिलांना मोफत पैठणी प्रशिक्षण, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण तसेच शिवसेना, युवासेना, शिवसेना महिला संघटनांकडून पूरग्रस्तांना मदतही करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी यंदा कोरोना आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले होते त्यामुळे विविध सामाजिक उपक्रमांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
- मंत्री अब्दुल सत्तारांचे ‘चहा प्रेम’, बाकावर बसून घेतला गावाकडच्या चहाचा आस्वाद!
- पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंनी केंद्र सरकारला केल्या ‘या’ तीन मागण्या
- ‘सरकारकडून ‘ती’ यादी राज्यपालांना पाठवली पण अद्याप मंजुरी नाही’ ; राष्ट्रवादीचा घणाघात
- पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंनी केंद्र सरकारला केल्या ‘या’ तीन मागण्या
- ‘क्रिडा विद्यापीठ औरंगाबादलाच मिळायला हवे’, यासाठी युवक काँग्रेस करणार जोरदार प्रयत्न!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

