Share

राज्य शासनाची ६०० कोटींची घोषणा फोल, एसटी कर्मचारी पगाराच्या प्रतिक्षेत हवालदिल

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सहाशे कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. मात्र घोषणा झाल्यानंतर अजूनही एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पगार जमा झालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. ६०० कोटी रुपयांमधून पहिला हफ्ता पुढील आठवड्यात एसटी महामंडळाला मिळण्याची शक्यता आहे. यामुळे आठवड्याच्या सुरवातीला एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संचारबंदीच्या निर्बंधांमुळे तीन महिन्यांपासून एसटी बसमधून प्रवासी वाहतूक बंद होती. ही वाहतूक बंद असल्यामुळे एसटीला मिळणारे उत्पन्न बंद झाले होते. या काळात एसटीतून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक सुरू होती. एसटीने माल वाहतुकीचाही प्रयोग केला. मात्र, मालवाहतुकीतून एसटीला अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. शिवाय, सरकारकडून देण्यात सहायता निधीतून एप्रिलचा एसटी कर्मचाऱ्यांचा शेवटचा पगार करण्यात आलेला होता. मेमध्येही लॉकडाउन सुरू होते.

दोन जूनपासून बससेवा सुरू करण्यात आली. बससेवा सुरू झाल्यानंतर या बसमधून प्रवासी कमी असल्यामुळे एसटीला अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. एसटीकडे पैसा नसल्याने मे महिन्याचा ७ जून रोजी होणार पगारही थांबला आहे. आर्थिक कोंडी सापडलेल्या एसटीला राज्य सरकारने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटी विभागाला सहाशे कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सहाशे कोटी रुपये देण्याची घोषणा झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होईल. अशी शक्यता निर्माण झालेली होती. मात्र, घोषणेच्या तीन ते चार दिवसांनंतरही एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. याचा फटका एसटीच्या कर्मचाऱ्यांना सोसावा लागत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!