मुंबई: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांना मोटारीखाली चिरडून मारल्याच्या निषेधार्थ आज सोमवारी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. लखीमपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन केली आहे.
आता याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी महाराष्ट्र बंदला मोठ्या संख्येने सहभागी व्हा. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकरी आंदोलनात नरसंहार करण्याऱ्या आधुनिक जनरल डायर योगी सरकारच्या निषेधार्थ शेतक-यांचे मारेकरी भाजप सरकारच्या विरोधात सहभागी होण्याचे आवाहन यशोमती ठाकूर यांनी केले आहे.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकरी आंदोलनात नरसंहार करण्याऱ्या आधुनिक जनरल डायर योगी सरकारच्या निषेधार्थ शेतक-यांचे मारेकरी भाजप सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीचा आज #महाराष्ट्र_बंद!
मोठ्या संख्येने सहभागी व्हा!#MaharashtraBandh pic.twitter.com/hLLHI6dGag— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) October 11, 2021
दरम्यान दरम्यान महाराष्ट्र बंदला आता पुण्यापाठोपाठ मुंबईतील काही व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. तर भाजपचे आशिष शेलार यांनीही ज्यांनी मुंबईला बंद करुन आपले दुकान चालवले त्या तथाकथित ‘बंदसम्राटांचा’ पुन्हा आज इतिहास आठवा.मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठींबा देऊन कामगारांना उध्वस्त केले. युनियनच्या नावाने कारखाने बंद करुन कष्टकरी,श्रमिकांना देशोधडीला लावले. एवढेच कशाला आता, सत्तेत आल्यावर मेट्रो कारशेडचे काम बंद करुन मुंबईकरांना वेठीस धरलेय. कोस्टल रोडला विरोध केला. नवी मुंबई, चिपी विमानतळाला विरोध, समृद्धी महामार्गला विरोध. मेट्रोचेही हे विरोधकच राहिले. महाविकास आघाडी सरकार म्हणजे विकासातील गतीरोधकच आहे. असा खोचक टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ठाणे पालिकेने ‘याकडे’ दुर्लक्ष केले तर..’, मंत्री जितेंद्र आव्हाडांचा इशारा
- बंद आणि विरोध यांचा ‘धंदा’, गोळा होतो त्यावरच ‘चंदा’; भाजपचा ठाकरे सरकारला टोला
- अन्नदात्यांचे ऋण फेडण्यासाठी बंदमध्ये सहभागी व्हा’, शिवसेनेचे आवाहन
- ‘महाविकास आघाडीवर नाराज असलो तरी महाराष्ट्र बंदला आमचा पाठिंबा’
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया


