Share

‘महाविकास आघाडीवर नाराज असलो तरी महाराष्ट्र बंदला आमचा पाठिंबा’

Published On: 

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांना मोटारीखाली चिरडून मारल्याच्या निषेधार्थ आज सोमवारी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लखीमपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन केली आहे. रविवारी रात्री १२ वाजेपासून हा बंद सुरू झाला आहे. संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा, जनआंदोलनाची संघर्ष समिती तसेच अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने बंदला पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, ‘महाविकास आघाडीवर नाराज असलो तरी महाराष्ट्र बंदला आमचा पाठिंबाच आहे, कोणी बंद पुकारला यापेक्षा उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे. अगदी जनरल डायरने सुद्धा शरमेने मान खाली घालावी या पद्धतीने गृह मंत्र्याच्या पुत्राने शेतकऱ्यांच्या अंगावरती गाडी घालून पाच शेतकऱ्यांना मारले. त्या शेतकऱ्या प्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी या बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होणार आहे, असंही राजू शेट्टी यांनी सांगितले.

तर दुसरीकडे, शेतकऱ्यांना आमचा पाठिंबा आहे, मात्र बंदला समर्थन नसल्याचे फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने (एफआरटीडब्ल्यूए) स्पष्ट केले आहे. संघटनेचे प्रमुख प्रमुख वीरेन शहा म्हणाले, गेल्या १८ महिन्यांत लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. आता सणासुदीमुळे ग्राहकी वाढली असताना आमचा व्यापार अबाधित राहू द्यावा, असे आम्ही सरकारला आवाहन करत आहोत. दुसरीकडे, पुणे व्यापारी महासंघाने महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला आहे. महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद राखा यांनी ही माहिती दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!