🕒 1 min read
ठाणे: कळवा- मुंब्रा या भागातील पाण्याच्या गैरसोयीकडे जर ठाणे महापालिकेने दुर्लक्ष केले तर आम्हाला ठाणे महापालिकेकडे पहावे लागेल, असा गंभीर इशारा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. याभागात गेल्या चार ते पाच दिवसापासून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
याविरोधातच मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना ठाणे पालिकेला गंभीर इशारा दिला आहे. यावेळी त्यांच्यासोबत शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि युवाध्यक्ष विक्रम खामकर हेदेखील उपस्थित होते.
गेल्या पाच दिवसांपासून कळवा- मुंब्रा भागात पाणी टंचाई भासत आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे की ठाणेकरांना पाणी देणे. त्यामध्ये ठाणे महापालिका कमी पडत असेल तर पालिकेला विचार करावा लागेल. पाच पाच दिवस पाणी न देणे हे योग्य नाही. ते काही सावत्र भाऊ म्हणून तुमच्याकडे आलेले नाहीत. जेव्हा पालिका स्थापन झाली तेव्हापासून कळवा-मुंब्रा ठाण्यातच आहे. असे असताना कळवा- मुंब्र्याला पाणी न मिळणे आता सहन करणार नाही. मी जरी मंत्री असलो तरी ठाणे महापालिकेला इशारा देतोय की, आमच्या पाण्याच्या गैरसोयीकडे दुर्लक्ष केले तर आम्हाला तुमच्याकडे लक्ष द्यावे लागेल, असा गंभीर इशारा मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अजित पवार आता जास्त दिवस बाहेर राहणार नाहीत; निलेश राणेंचा दावा
- खेळाडूंसाठी ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय; शासन सेवेत 5 टक्के कोटा राखीव
- ‘शरद पवार आजही कारखानदारांचेच, आम्ही त्यांचे गुलाम नाही’
- ‘अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार’
- ‘योगी आदित्यनाथ यांना लाज वाटली पाहिजे’, ओवैसींचा हल्लाबोल
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
