🕒 1 min read
मुंबई: राज्यातील महाविकास आघाडीने लखीमपुर घटनेला विरोध म्हणून महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला आता पुण्यापाठोपाठ मुंबईतील काही व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे.दरम्यान यावरच भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधत टीका केली आहे.
बंद आणि बंद. ज्यांनी मुंबईला बंद करुन आपले दुकान चालवले त्या तथाकथित ‘बंदसम्राटांचा’ पुन्हा आज इतिहास आठवा.मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठींबा देऊन कामगारांना उध्वस्त केले. युनियनच्या नावाने कारखाने बंद करुन कष्टकरी,श्रमिकांना देशोधडीला लावले. एवढेच कशाला आता, सत्तेत आल्यावर मेट्रो कारशेडचे काम बंद करुन मुंबईकरांना वेठीस धरलेय. कोस्टल रोडला विरोध केला. नवी मुंबई, चिपी विमानतळाला विरोध, समृद्धी महामार्गला विरोध. मेट्रोचेही हे विरोधकच राहिले. महाविकास आघाडी सरकार म्हणजे विकासातील गतीरोधकच आहे. असा खोचक टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.
एवढेच कशाला आता, सत्तेत आल्यावर मेट्रो कारशेडचे काम बंद करुन मुंबईकरांना वेठीस धरलेय..
कोस्टल रोडला विरोध…नवी मुंबई, चिपी विमानतळाला विरोध, समृद्धी महामार्गला विरोध..
मेट्रोचेही हे विरोधकच..
हे तर विकासातील गतीरोधक!बंद आणि विरोध यांचा "धंदा"
गोळा होतो त्यावरच "चंदा"!
2/3— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 11, 2021
आई जगदंबेच्या नवरात्रीत महाराष्ट्र बंद
ही तर तिघाडीतील तीन पक्षांची "महिषासुरी"चालआई दुर्गामाते जनतेला दे “बळ”!
उधळून टाकील जनता या महिषासुरांचा हा “खेळ”!
3/3— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 11, 2021
एवढेच नाही तर बंद आणि विरोध महाविकास आघाडीचा धंदाच आहे. आणि यावरच त्यांचा चंदा गोळा होतो.आई जगदंबेच्या नवरात्रीत महाराष्ट्र बंद करणे म्हणजे तिघाडीतील तीन पक्षांची महिषासुरी चाल आहे. आई दुर्गामाते जनतेला बळ दे. आता जनताच या महिषासुरांचा खळे उधळून टाकेल असा इशारा आशिष शेलार यांनी ट्वीट करत दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ठाणे पालिकेने ‘याकडे’ दुर्लक्ष केले तर..’, मंत्री जितेंद्र आव्हाडांचा इशारा
- खेळाडूंसाठी ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय; शासन सेवेत 5 टक्के कोटा राखीव
- ‘शरद पवार आजही कारखानदारांचेच, आम्ही त्यांचे गुलाम नाही’
- ‘अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार’
- ‘योगी आदित्यनाथ यांना लाज वाटली पाहिजे’, ओवैसींचा हल्लाबोल
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
