पुणे : कोरोनामुळे राज्यासह देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. त्यामुळे महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावल्याने राज्यातील शाळांपाठोपाठ महाविद्यालये आणि विद्यापीठे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे. आजपासून राज्यभरातील कॉलेज सुरु होत आहेत. मात्र अनेक कॉलेजेसच्या एसओपी जाहीर होत नसल्यानं विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण होतं. मात्र आज औरंगाबाद आणि पुणे विद्यापीठानं संबंधित महाविद्यालयांच्या प्रशासनाला आदेश जारी केले आहेत. याशिवाय राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालये आजपासून सुरू होणार आहे.
महाविद्यालये आणि विद्यापीठात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन सुविधा असणार आहे. तर दोन लशी घेतलेल्यांनाच महाविद्यालयात प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच एका बाकावर केवळ एकाच विद्यार्थ्याला बसविण्यात येणार आहे. प्रत्येकाला मास्क, सॅनिटायजर व सुरक्षित अंतर राखणे बंधनकारक असणार आहे. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
20 ऑक्टोबरपासून कॉलेज सुरु करण्याबाबत राज्य सरकारनं हिरवा कंदील दिला आहे. मात्र पुणे, औरंगाबाद विद्यापीठ, आणि कृषी विद्यापीठाकडून कालपर्यंत त्यासंदर्भातले आदेश महाविद्यालयांना मिळाले नव्हते. मात्र आज आदेश जारी केल्यानं विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘चंद्रकांत पाटील कर्तबगार, निष्कलंक, छळकपट, विश्वासघात न करणारे नेते’; भाजप नेत्याचे स्तुतीसुमने
- ‘मराठवाड्याने कोकणातील १६८ टीएमसी पाणी विसरावे, याकरिता जयंत पाटलांकडून १९ टीएमसीचे गाजर’
- ‘लोकांना सिनेमा आणि नाट्यगृहापर्यंत पुन्हा कसे आणायचे हे मोठे आव्हान’, संजय राऊतांनी व्यक्त केली चिंता
- यंत्रणेचे काम हे कोणाला घाबरवण्याचे असू नये- पंतप्रधान मोदी
- ओबीसींच्या प्रश्नांसाठी महाविकासआघाडी कायम लढत राहणार – छगन भुजबळ


