बडोदा : देशाची फसवणूक करणाऱ्यांसाठी जगात कुठलीही जागा सुरक्षित असता कामा नये. कोणी कितीही ताकदवान असेल, जर ती व्यक्ती राष्ट्रहीत आणि जनहीत यांच्या मध्ये येत असेल तर त्यावर कठोर कारवाई केंद्रीय यंत्रणांनी करावी असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ते गुजरात येथे केंद्रीय मुख्य दक्षता आयोग आणि केंद्रीय अन्वेषण विभाग यांच्या संयुक्त परिषदमध्ये अधिकाऱ्यांना संबोधित करतांना बोलत होते.
यावेळी नरेंद्र मोदी यांनी २०१४ पूर्वी असलेल्या सरकारच्या कार्यपद्धतीवर टीकाही केली. याआधी सरकारमध्ये भ्रष्ट्राचार विरोधात कारवाई करण्याची राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीची कमतरता होती. मात्र गेल्या सहा सात वर्षात विविध पावले उचलत भ्रष्टाचाराचे अनेक मार्ग बंद केले, डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करत विविध सुविधा आणल्या आहेत, लोकांच्या जीवनात सरकारचा हस्तक्षेप कमीत कमी ठेवला आहे. यामुळे भ्रष्टाचाराला वाव राहिला नाही, असा दावाही पंतप्रधान मोदींनी यावेळी केला.
My remarks at the joint conference of the CVC and CBI. https://t.co/cZnUZ0Il3M
— Narendra Modi (@narendramodi) October 20, 2021
केंद्रीय यंत्रणेचे काम हे कोणाला घाबरावयाचे नाही. असे मोदी उपस्थित अधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले. विनाकारण या यंत्रणेबद्दल लोकांच्या मनात असलेली भीती काढून टाकली पाहिजे. आम्ही कठोर कायदे केले आहेत, ते कायदे लागू करणे तुमचं काम आहे. जेव्हा अनियमितता, गैरव्यवहार, भ्रष्टाचार होतो तेव्हा केंद्रीय यंत्रणांचे काम सुरू होते. पण यापेक्षा प्रतिबंधात्मक दक्षतेवर काम करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे यामुळे केंद्रीय यंत्रणांना काम करणं सोपं होईल आणि देशातील यंत्रणेचा वेळ वाचेल असे मतही मोदींनी यावेळी व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांच्या शोधासाठी केंद्रीय तपास यंत्रणा पुन्हा सक्रिय, पकडण्यासाठी परत छापेमारीची शक्यता
- ‘चंद्रकांत पाटील कर्तबगार, निष्कलंक, छळकपट, विश्वासघात न करणारे नेते’; भाजप नेत्याचे स्तुतीसुमने
- ‘मराठवाड्याने कोकणातील १६८ टीएमसी पाणी विसरावे, याकरिता जयंत पाटलांकडून १९ टीएमसीचे गाजर’
- ‘लोकांना सिनेमा आणि नाट्यगृहापर्यंत पुन्हा कसे आणायचे हे मोठे आव्हान’, संजय राऊतांनी व्यक्त केली चिंता
- भाजपला आघाडी द्या अन् गाव जेवण घ्या; चंद्रकांत पाटलांची देगलूरच्या कार्यकर्त्यांना ऑफर


