🕒 1 min read
कोलकाता: निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसं पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरणही तापू लागलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला आणखी एक झटका बसला आहे. टीएमसीचे आमदार दीपक हल्दर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. टीएमसीसाठी हा मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.
भाजप तृणमूल काँग्रेसमधील भ्रष्टाचारी नेत्यांना विकत घेऊ शकते. मात्र, तृणमूल काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते विकले जाणार नाहीत, असे वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले. तृणमूल काँग्रेसमध्ये भ्रष्टाचारी नेत्यांना स्थान नाही. त्यामुळे ज्यांना आमच्या पक्षातून बाहेर पडायचे आहे त्यांनी तातडीने निघावे, असेही ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
पश्चिम बंगालमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपने सुवेंदू अधिकारी यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या बड्या नेत्यांना गळाला लावले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर तृणमूल काँग्रेस खिळखिळी होताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही, हिंदूविरोधी वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल’
- आरक्षण भूसंपादनाबाबत शिवसेनेचे दुटप्पी धोरण- भालचंद्र शिरसाट
- रस्ता रोको किंवा इतर विरोध प्रदर्शनात सहाभागी झाल्यास सरकारी नोकरी मिळणार नाही
- ‘तू शांत रहा, आम्ही तुझ्यासारखे मुर्ख नाही’; जगप्रसिद्ध पॉपस्टारला कंगनाच प्रतिउत्तर !
- शरजील उस्मानीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी चंद्रकांत पाटलांचे थेट योगींना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
