Share

भारताच्या ‘या’ क्रिकेटपटूचे ‘आयसीसी- मेन्स-प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी नामांकन

Published On: 

नवी दिल्ली : इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग यांच्यासह भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याला ‘आयसीसी- मेन्स – प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील क्रिकेटपटूंकडून वर्षभर सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी हे नामांकन देण्यात येतं.

23 वर्षीय पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले आणि सिडनी इथे त्याने 97 धावा केल्या आणि खेळी अनिर्णित राहिली. पाठोपाठ ब्रिस्बेन इथे नाबाद 89 धावा करत त्याने भारताला ऐतिहासिक मालिका जिंकून विजय मिळवून दिला. या कामगिरीमुळेच त्याला या सर्वोत्तम क्रिकेटपटूचं नामांकन देण्यात आलं आहे.

दरम्यान,ब्रिस्बेन मधील गाबाच्या मैदानावर झालेल्या मालिकेच्या चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात पंतच्या नाबाद ८९ धावांच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला तीन गडी राखून पराभूत केले. त्यासोबतच याच दौऱ्यात त्याच्या नावावर दोन अर्धशतकांचा देखील समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!