औरंंगाबाद : महाविद्यालयीन युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.२७) दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आली. ईशा राजेश तंगडपल्ली (वय १८, रा. विठ्ठल मेहंदी दुकानाशेजारी, मोहन थिएटरमागे, सराफा) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. दरम्यान तिच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही.
ईशा तंगडपल्ली ही सरस्वती भवन महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास घराची साफसफाई करते असे सांगत ईशाने आजीला घराबाहेर थांबण्यास सांगून स्वयंपाक खोलीत जावून गळफास घेतला होता.
हा प्रकार दुपारी घरी आलेल्या तिच्या लहान भावाच्या लक्षात आल्यावर त्याने शेजा-यांना बोलावून घेत ईशाला तात्काळ बेशुध्दावस्थेत घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘विजय वडेट्टीवार यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचं खातं द्यायला हवं होतं, मात्र…’
- पुण्यात उद्यापासून नियम आणखी कडक; जाणून घ्या आज किती रुग्ण संख्या
- औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी; कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट
- ‘तो वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो’; विजय वडेट्टीवारांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला
- ‘सत्तेचा माज किती असू शकतो त्याचे हे जिवंत उदाहरण’; भातखळकरांचा संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

