🕒 1 min read
मुंबई : दिल्लीचा महत्वाचा खेळाडू आर आश्विनने स्पर्धेतुन माघार घेत असल्याचे ट्विट करून सांगितले होते. अश्निनने ट्विटमध्ये लिहीले की, ‘यावर्षी सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेतुन मी उद्यापासून म्हणजे २६ एप्रिलपासुन मी विश्रांती घेण्याचा निर्णय घेत आहे. कोरोनाच्या कठीण काळात माझे कुटूंब हे कोरोनाशी लढा देत असताना मी त्यांना पाठिंबा देऊ इच्छितो. मला आपेक्षा आहे जर सर्वकाही ठीक राहिले तर मी पुन्हा खेळयला सज्ज होईल धन्यवाद.’
कोरोनाच्या कठीण काळात कुटुंबाला साथ देण्यासाठी त्याने निर्णय घेतला आहे. सध्या भारतात कोरोना विषाणुने घातलेला थैमान बघून आश्विन व्यथित झाला होता. या संदर्भात त्याने ट्विट केले होते. तसेच त्याने पुढे आणखी एक ट्विट करत ‘कोरोनाच्या या लढाईत तुमच्या सोबत आहे. कोणाला काही मदत हवी असल्यास मला सांगा. माझ्या परीने होईल तशी मदत करण्याचा मी प्रयत्न करेल.’ तसेच अश्विनने त्याच्या ट्विटर हँडलचे युजर नेम बदलून ‘स्टे होम स्टे सेफ! टेक युअर वॅक्सिन’ असे केले होते.
I would be taking a break from this years IPL from tomorrow. My family and extended family are putting up a fight against #COVID19 and I want to support them during these tough times. I expect to return to play if things go in the right direction. Thank you @DelhiCapitals ????????
— Ashwin ???????? (@ashwinravi99) April 25, 2021
यावरच दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंगची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘दिल्लीच्या संघात दररोज कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा होते. मला आशा आहे की सगळं काही ठीक होऊन अश्विन पुन्हा दिल्लीसाठी खेळताना दिसेल, अशी प्रतिक्रिया पाँटिंगने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरून अमरावतीची बदनामी करू नका, आरोग्य विभागाचे आवाहन
- घर का भेदी..! युवतीने मित्राच्या मदतीने घरातून चोरले २० तोळे सोने
- ऑक्सिजनबाबत बुलडाणा प्रशासन गाफिल, आ.श्वेता महालेंची तक्रार
- होम आयसोलेशन बंद करून सक्तीचे विलगीकरण करा, मंत्री थोरात यांच्या सुचना
- ‘शैक्षणिक वर्ष संपल्याची घोषणा करा’, शिक्षणमंत्री गायकवाड यांना निवेदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
