मुंबई : काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषेद घेवून ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयांची माहिती दिली. सध्या महाराष्ट्रावर तिसऱ्या लाटेचे संकट आहे. त्यामुळे राज्यात कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाही. जे नियम सध्या लागून आहे ते तसेच राहणार आहे, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे.
त्यावर आता विरोधकांनी मात्र चांगलीच टीकेची झोड उठवली आहे. यावरूनच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला इशारा देत म्हटले आहे की, ‘सरकारने जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये वेठीस धरू नये. रुग्णसंख्या कमी झाली आहे. मग जनतेला वेठीस का धरता? निर्बंध का उठवत नाही? असा प्रश्न माध्यमांशी बोलताना संदीप देशपांडेंनी विचारला आहे.
हा विषय आक्रमक होण्याचा नाही, याचे परिणाम सरकारला भोगावेच लागणार. आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिले की रेल्वे सुरू करा, पण त्यांना घरातच बसून राहायचे आहे, अशी टीकाही देशपांडेंनी केली. तसेच ‘ज्यांच्या दोन लसी झाल्या त्यांना निर्बंधातून बाहेर काढा ही आमची मागणी आहे. लसीकरण झाले तरीही निर्बंध असतील, तर लसीकरणाचा उपयोग काय? या सरकारने काय कामे केली? शाळेच्या शुल्काचा प्रश्न आहे, व्यापारी नाराज आहेत, हे वसुली सरकार हफ्तेखेरी करते आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- गणेशोत्सवासाठी कोकणात २२०० बस सोडणार, १६ जुलैपासून आरक्षण सुरु
- पंतप्रधान मोदी वाराणसीत दाखल, १५०० कोटींच्या कामांचे लोकार्पण करणार
- पंतप्रधान मोदी युवकांना म्हणाले, ‘ज्याच्याकडे स्किल असेल तोच पुढे जाईल’
- …अन्यथा आमचा लढा पुन्हा सुरु करु, खासदार संभाजी छत्रपतींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- आमिर-किरणचा एकत्र डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

