मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आषाढी एकादशीला भाविकांना पंढरीत येण्यास प्रशासनाने बंदी घातली असली तरी समस्त वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी पंढरपूरला जाणार, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला संबोधित करताना सांगितले आहे.
कोरोनामुळे यंदा महत्वाचे पालखी सोहळेही रद्द करण्यात आले असून या मानाच्या पालख्या आता एसटी बसने फक्त वीस जणांसह पंढरपूरात आणण्यास परवानगी देण्यात आली आहे. कालच गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांच्यासह विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली होती.
ठाकरे म्हणाले की, शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन यंदाची आषाढी वारी ही घरी राहूनच मनाने साजरा करण्याचा निर्णय घेऊन कोरोना विरोधातील लढाईत योगदान दिल्याबद्दल समस्त वारकऱ्यांचे आभारी असल्याचे म्हंटले आहे. तसेच आषाढी एकादशीला मी विठ्ठलाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण जगातील कोरोनाचे संकट दूर करावं, असे साकडं घालणार असल्याची माहितीही ठाकरे यांनी दिली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

