मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून राज्यात सर्व काही पूर्ववत होत होते. पण काही जण कोरोना संदर्भातील नियम पाळत नसल्यामुळे आता कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
कोरोनाचं संकट महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढत असताना दिसतंय. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, लग्न समारंभ, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. यामुळेच महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे. यामुळेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधत आहेत.
‘काही दिवसांपूर्वी कोरोनाची स्थिती आटोक्यात आली होती. मात्र, लोकांनी निष्काळजीपणा केला. मास्क वापरणं कमी केलं. खबरदारी घेतली नाही. आता स्थिती पुन्हा पलटतेय. वेळीच सावध होणं गरजेच आहे. कोरोना काळात ज्यांनी जीवाची पर्वा न करता राज्यासाठी सेवा केली. अनेकांना जीवनदान दिलं. त्यांचा कोव्हीड योद्धा म्हणून सत्कार केला जात आहे. फक्त शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान होणार नाही. त्यांचं योगदान अमूल्य आहे. त्यामुळे कोव्हीड योद्धा होता येत नसेल तर किमान कोव्हीडदूत तरी होऊ नका. कोव्हीडदूत होऊन कोरोना पसरायला मदत करू नका, तर कोरोनाला आळा घाला,’ असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ८ दिवसांत परिस्थिती नियंत्रणात न आल्यास आणखी कडक निर्बंध लावणार – छगन भुजबळ
- राणा दाम्पत्याला विना मास्क ‘बुलेट वारी’ पडली महागात, गुन्हा दाखल
- पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची दारं भाविकांसाठी पुन्हा बंद !
- कोरोना विषाणू घातक, काळजी घेण्याची गरज : शरद पवार
- ‘राष्ट्रवादी म्हणजे खानावळ नाही, भाजपमधून परत आलेल्यांना चटके सोसू द्या’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

