मुंबई : राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत दि. १ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ करण्यात आली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह देशात हाहाकार माजवला असून राज्यात अद्यापही नव्या कोरोना बाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस २० हजारांहून अधिक संख्येने वाढत आहे.
राज्यातील लॉकडाऊन पुन्हा १ जूननंतर वाढणार की काही दिलासा मिळणार याकडं राज्यातील जनतेचं लक्ष्य लागलं होतं. दुकानदार, व्यावसायिकांनी निर्बंध शिथिल करत दुकाने खुली करण्यास परवानगी द्यावी अन्यथा स्वतः उघडू असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला होता. राज्यातील मंत्र्यांनी लॉकडाऊन हटवला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी शिथिलता देण्यात येईल असं विधान केलं होतं.
अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा असल्याने ते काय निर्णय घेणार याकडं जनतेचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधत आहेत. यावेळी ते म्हणाले, ‘ऑक्सिजनसाठी खूप तारांबळ उडाली. बाहेरच्या राज्याहून ऑक्सिजन आणावे लागत होते. ही संपूर्ण यातायात कशी निभावून नेली ते प्रशासनाचं कौतुक करावं लागलं. हे सगळं फार तारेवरची कसरत होती. आता जो अवतार बदललेला विषाणू आहे त्याच्यावर आपण ताबा आणलेला नाही. हा विषाणू आता सुटला आणि तिसरी लाट आली तर आपल्याला फार कठीण जाईल. त्यामुळे फार काळजी घ्यावं लागणार आहे. हे कमी होतं की काय आता काळी बुरशी आलेली आहे.’
महत्वाच्या बातम्या
- १५ दिवसात १ कोटी रुपये देत माफी मागा, अन्यथा फौजदारी गुन्हा ; निलेश लंके आक्रमक
- कोरोनाचा उगम चीनच्याच प्रयोगशाळेत; समोर आला ‘हा’ पुरावा
- मोदींनी गेल्या सात वर्षात जनतेचा विश्वास गमावला ; शिवसेना खासदाराची टीका
- ‘मोदी सरकारच्या काळात दक्षिण भारतीय चित्रसृष्टी आणि हॉलीवूडलाही लाजवेल, असे स्टंट पाहायला मिळाले’
- मराठा आरक्षण : पायात पाय घालण्यापेक्षा हातात हात घालून काम करू – अशोक चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

