बीजिंग – कोरोना विषाणूच्या उत्पत्तीचा स्त्रोत शोधण्यासाठी अमेरिकेतील गुप्तचर संस्थांना राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आदेश दिले आहेत . जगभरातील वैज्ञानिकांनी त्याचे स्वागत केले आहे . त्यावर नवनवे खुलासे दररोज पुढे येतात . या विषाणूचा जन्म चीनमधील प्रयोगशाळेतच झाला , असा दावा करणारा आणखी एक खुलासा पुढे आला आहे.
चिनी वैज्ञानिकांनी विषाणू तयार केल्यानंतर त्याला रिव्हर्स-इंजिनिअरिंग व्हर्जनमध्ये बदलण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून हा विषाणू वटवाघळापासून आल्याचा जगाचा समज होईल. मात्र, त्यांचे हे कारस्थान अपयशी ठरले आहे असा आरोप दोन संशोधकांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे करोनाचे उत्पत्तीस्थळ शोधण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या अमेरिकेला पुन्हा बळ मिळणार आहे.
ब्रिटनचे प्रोफेसर अँगस डल्गलिश आणि नॉर्वेचे शास्त्रज्ञ डॉ. बिर्गर सोरेनसेन यांनी दावा केला आहे की, त्यांच्याकडे एक वर्षापेक्षा सुद्धा जास्त काळापासून चीनच्या व्हायरसचे रेट्रो इंजिनियरिंगचे पुरावे आहेत. प्रोफेसर डल्गलिश लंडन सेंट जॉर्ज युनिव्हर्सिटीत कॅन्सर विज्ञानाचे प्रोफेसर आहेत. तर डॉ. सोरेनसेन एक वायरोलॉजिस्ट आणि इम्यूनोर कंपनीचे अध्यक्ष आहेत. त्यांची कंपनी कोरोनाची व्हॅक्सीन तयार करत आहे.
स्टडीनुसार, वुहान लॅबमध्ये जाणीवपूर्वक डाटा अगोदर लपवला गेला आणि नंतर नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्या शास्त्रज्ञांनी यावरून आवाज उठवला होता त्यांना एकतर गप्प केले किंवा नंतर गायब केले. त्यांनी सांगितले की, कोरोना सॅम्पल्सच्या अभ्यासादरम्यान त्यांनी एक फिंगरप्रिंट शोधला होता. हे लॅबमध्ये व्हायरससोबत छेडछाडनंतरच शक्य आहे.
महत्वाच्या बातम्या
- चंद्रकांतदादांना मस्ती आलीये; अजित पवारांवरील ‘त्या’ टीकेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्याने झापलं
- मान्सून लांबणीवर ? केरळात १ ऐवजी ३ जूनला दाखल होणार, तर राज्यात मान्सून पूर्व पावसाचा इशारा !
- मोदींनी गेल्या सात वर्षात जनतेचा विश्वास गमावला ; शिवसेना खासदाराची टीका
- छपाईच्या पलीकडं ‘वसुली सरकार’ला काहीही सुचत नाही; भाजप आमदाराची खोचक टीका
- ‘मुख्यमंत्री ठाकरे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, नागरिकांना लॉकडाऊनमध्ये ठेवणं त्यांनाही आवडत नाही’


