मुंबई : सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते, रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे. शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण, जातीअंताचा लढा यांसह कृषी- सिंचन, औद्योगिक क्षेत्रांतील विकासात्मक दृष्टी यातून समाजाला प्रगतीच्या दिशेने नेणारे राजर्षी शाहूंचे विचार आजही दिशादर्शक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, राजर्षी शाहू महाराजांनी लोकाभिमुख आणि समतामुलक कार्याचा आदर्श घालून दिला. शिक्षणातून समाजाला शहाणे करण्यासाठी आणि सामाजिक समता – सुधारणांबाबत त्यांनी क्रांतीकारक अशी पावले उचलली. समाजाला प्रगतीच्या दिशेने नेणारे राजर्षी शाहूंचे विचार आजच्या काळातही दिशादर्शक आणि क्रांतीकारक आहेत. त्यांच्या या कार्याला कोटी-कोटी प्रणाम आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यस्मृतींना विनम्र अभिवादन.
तर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक न्यायाचे आदर्श राज्य निर्माण केले. सक्तीचे शिक्षण, दुर्बल घटकांना आरक्षण, पायाभूत सुविधांची निर्मिती, क्रांतिकारी सामाजिक सुधारणा करून सर्व घटकांना न्याय, विकासाची संधी दिली. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारातच समाजाला एकजूट ठेवून पुढे घेऊन जाण्याची ताकद आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- माझा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार विरोधकांना नाहीच; चव्हाणांचे खडेबोल !
- सलमानच्या ‘ राधे ‘ सिनेमाची रक्कम कोरोनाग्रस्तांच्या उपचारांसाठी दिली जाणार
- ‘ग्रामीण भागात कोविड सेंटरचे दर जास्त’, आरोग्यमंत्री टोपेंना मेहबूब शेख यांचा घरचा आहेर
- डॉक्टरांबद्दल वादग्रस्त विधानामुळे अभिनेता सुनील पालच्याविरोधात तक्रार दाखल
- औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांना भर रस्त्यात चोपला पाहिजे; रितेश देशमुखचा संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

