Share

मुंबईकरांसाठी खुशखबर! मालमत्ता करासंबंधी मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

Published On: 

मुंबई: शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच जनतेसमोर लाईव्ह आले, नगरविकास खात्याची आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक पार पडली. मात्र विधिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित असल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर विरोधकांनी चांगलीच टीका केली होती. प्रमुख नसेल तर राज्य कसं चालणार, अशा शब्दात भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दणवे यांनी टीका केली होती.

शस्त्रक्रियेनंतर मात्र उद्धव ठाकरे यांनी नगरविकास खात्याच्या बैठकीला ऑनलाईन उपस्थिती लावली. या बैठकीत मुंबईकरांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईकर म्हटले की मुंबईकरांनी फक्त करच भरायचे का? मुंबईकर आधीच कर एवढा कर देत आहेत, त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुखांनी मुंबईवर जे प्रेम केले तेच प्रेम आम्ही पुढे नेत आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मालमत्ता करा बद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. ५०० चौरसफुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करत असल्याची मोठी घोषणा ठाकरेंनी केली. ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात माफी दिल्यामुळे आता महापालिकेचा दरवर्षी ३४० कोटींचा कर बुडणार आहे. मुंबईमध्ये ५०० चौरस फुटांचे जवळपास १५ लाख घरे आहेत. ज्यामध्ये २८ लाख कुटुंब राहतात. या कुटुंबांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!