मुंबई: भाजप नेते आशिष शेलार (BJP leader Ashish Shelar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीकडून त्यांना फोन कॉलवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याविरोधातच त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान यावरच भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP leader Chitra Wagh) यांनी संताप व्यक्त करत ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.
‘भाजपचे जेष्ठ नेते आशिष शेलार यांना व त्यांच्या परीवाराला विखारी भाषा वापरत जीवे मारण्याची धमकी दिली जाते. मुख्यमंत्रीजी सरकार तालीबानांच्या ताब्यात सोपवलयं का? असा संतप्त सवाल करत एकीकडे मुख्यमंत्री हॉलीडेमुड मध्ये तर गृहमंत्री विकेंडमुड मधून अजूनही बाहेर पडले नाहीत. राज्यात सरकार नावाची गोष्ट उरलीये? असा खोचक सवालही चित्रा वाघ यांनी केला आहे.
तसेच जर आशिष शेलार यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना काहीही झाले तर त्याचे सर्वस्वी जबाबदार मुख्यमंत्री ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील असतील. त्यामुळे २४ तासांच्या आत धमकी देणाऱ्या व्यक्तीला पकडून त्याच्यावर कठीण कारवाई करा, अन्यथा जे काही होईल त्याचे जबाबदार मुख्यमंत्री ठाकरेच असतील. असा इशारा चित्रा वाघ यांनी ट्वीट करत दिला आहे.
भाजपाचे जेष्ठ नेते @ShelarAshish यांना व त्यांच्या परीवाराला विखारी भाषा वापरत जीवे मारण्याची धमकी दिली गेलीये@CMOMaharashtraसरकार तालीबानांच्या हातात सोपवलयं का?
एकीकडे मुख्यमंत्री हॉलीडेमुड मध्ये तर गृहमंत्री विकेंडमुड मधून बाहेर पडले नाहीत
राज्यात सरकार नावाची गोष्ट उरलीये?? pic.twitter.com/lN3Jw5TInc— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 8, 2022
दरम्यान आशिष शेलार यांना सतत दोन नंबरवरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणारे कॉल आले आहेत. शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने त्यांनी पोलीस आयुक्तांकडे याची तक्रार केली आहे. दरम्यान शेलार आता गृहमंत्र्यांनाही पत्र लिहिणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी पोलीस आयुक्तांना दोन्ही नंबरची माहिती दिली असून याबाबत तपास करण्याची विनंती केली आहे. दरम्यान २०२० साली देखील वांद्रे पोलिसांनी अशाच एका व्यक्तीला अटक केली होती. ज्याने आशिष शेलार यांना धमकी दिली होती. तसेच दोन दहशतवादी व्यक्तींकडूनही आशिष शेलार यांची अतिरेकी केल्याची माहिती समोर आली होती. आता पुन्हा एकदा आशिष शेलार यांना अशा पद्धतीची धमकी देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “महाराष्ट्राचे पोलीस सक्षम, कुठलाही हमला होऊ शकत नाहीत”, पटोलेंनी दिली ‘त्या’ घटनेवर प्रतिक्रिया
- ‘महादेवाची कृपा होती म्हणून, नाहीतर मोदींची हत्या…’; केंद्रीय मंत्र्याचं वक्तव्यं
- ‘त्या’ चर्चेवर पटोलेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, …त्यात गैर काय?
- भाजप नौटंकीबाज, युपीची निवडणूक लढण्यास काँग्रेस तयार-नाना पटोले
- “पंतप्रधान ओबीसी असतांना त्यांच्याकडून समाजाला अनेक आशा होत्या, परंतु…”

