Share

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना केला ‘असा’ उल्लेख!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांना विविध स्तरातून शुभेच्छा मिळत आहेत. मात्र शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे त्यांच्या या वाढदिवसावर दुःखाचे चावट पाहायला मिळत आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनीही ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट करत उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र या ट्वीटमध्ये शिंदेंनी ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख न केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.’अशा शुभेच्छा देताना शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख म्हणुन उल्लेख करण्याचे टाळले आहे. त्याऐवजी त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. शिंदेंच्या या शुभेच्छांमुळे सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसावेळी प्रत्येक वर्षी कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळतो. त्याप्रमाणे यावेळी मातोश्रीवर ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. त्याचबरोबर कार्यकर्त्यांकडून मातोश्री बाहेर फुलांनी सजवलेला धनुष्यबाण अनेकांचे आकर्षण ठरत होते. तसेच या वाढदिवसाच्या औचित्य साधून कार्यकर्त्यांकडून मोठे शक्ती प्रदर्शन करण्याचीही दाट शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर ते तब्बल ४० आमदारांना सोबत घेऊन गेले. यानंतरही शिवसेनेला लागलेली गळती थांबलेली नाही. पक्षातील खासदार व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटाकडे वळताना पाहायला मिळाले. या सगळ्या नंतर आता शिंदे गट आणि शिवसेना मध्ये थेट धनुष्यबाणासाठीच लढाई सुरू आहे. धनुष्यबाण नेमका कोणाचा असा संघर्ष सुरू आहे. एकनाथ शिंदे गटाकडून आम्हीच शिवसेना आहोत त्यामुळे धनुष्यबाण आमचा आहे असा दावा ठोकला जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!