Share

Udhdav Thackeray : फडणवीस उपमुख्यमंत्री आणि शिंदे मुख्यमंत्री या डावपेचांवर उध्दव ठाकरेंचे भाष्य; म्हणाले…!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील राजकारणात मोठ्या बंडखोरीच्या घडामोडी घडल्या. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीचे सरकार होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याचे राजकीय चित्रच बदलून गेले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या पदावरून अनपेक्षितरित्या पायउतार व्हावे लागले. यानंतर घडलेल्या घडामोडींचा कोणी विचारही करू शकत नव्हते. भाजपने थेट एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपदावर बसवले. तर मुख्यमंत्री पदासाठी प्रमुख दावेदार मानले जाणारे देवेंद्र फडणवीस नाईलाजाने का होईना उपमुख्यमंत्री पदावर बसले. सरकार स्थापन करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मी सरकार बाहेर राहून काम करायला असे म्हटले होते. मात्र पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे शेवटच्या क्षणी त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली. या संपूर्ण राजकीय नाट्याची चांगलीच चर्चा रंगली होती.

देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणूकीनंतर मुख्यमंत्री पद मिळवले होते. मात्र त्यांना यावेळी उपमुख्यमंत्री पदावर बसावे लागेल असा कोणीही विचार केला नव्हता. अगदी विरोधकांनीही भाजपच्या या निर्णयावरून देवेंद्र फडणवीस यांना घेतले होते. आता यात मुद्द्यावर पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. या घडामोडीनंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच जाहीर मुलाखतीला सामोरे गेले आहेत. मुलाखती दरम्यान, आज तुम्हाला महाराष्ट्रातील परिस्थिती हास्यजत्राचा दुसरा सिझन वाटत नाही का? ज्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं ते उपमुख्यमंत्री झालेले दिसताय, असे विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्याचं त्यालाच ठाऊक, असे करण्याची वेळ का आल माहिती नाही.

देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीही ५ वर्ष मुख्यमंत्री पद सांभाळले आहे. यावर बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, त्यांच्याबरोबर असं का झालं, त्यांना असं का वागलं गेलं हे काही मला कळलं नाही. ठीक आहे, तो त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. त्यांच्या पक्षातले अनेक जुने जाणते आजही माझ्यासोबत संपर्कात आहेत. ही लोक भाजपमध्ये निष्ठेने काम करत आहेत. उगाच त्यांच्या बाबत अफवा पसरवू नका. किती आता लगेच शिवसेनेत येतील किंवा इतर कोणत्या पक्षात जातील. त्यांनी वेळोवेळी भाजपशी एकनिष्ठ राहून काम केले आहे. आताही त्यांनी हे मुख्यमंत्री पदाचे डावपेच जड मनाने सोसलेच आहेत. असेही ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!