Share

Uddhav Thackeray : निवडणूक होऊ द्या! शिवसेनेचा पुन्हा मुख्यमंत्री होईल – उद्धव ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

Uddhav Thackeray । मुंबई : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची वादळी मुलाखत शिवसेना खासदार आणि सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली. त्याचा पहिला भाग काल प्रदर्शित झाला. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चौफेर टीका केली. तर यानंतर आज मुलाखतीचा दुसरा भाग प्रदर्शित झाला. या मुलाखतीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचा मुखमंत्री होईल असा विश्वास व्यक्त केलाय.

मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी ठाकरेंना प्रश्न विचारला की, शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल? त्यावर ठाकरे म्हणाले की, का नाही होणार. तो जर करायचा नसेल तर माझ्या लढायला काय अर्थ आहे. माझं जे शिवसेनाप्रमुखांना वचन आहे ते आजही कायम आहे. मी शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे. शिवसेनाप्रमुखांचं वचन आजही कायम आहे. मी पण शिवसैनिकचं आहे पण मी मुख्यमंत्री होणार असं कधीही म्हणालो नव्हतो. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याची वचनपूर्ती झाली. वचन पूर्ण केल्यानंतर सुद्धा मी काय दुकान बंद करून बसणार नाही. शिवसेना मला वाढवायची आहे. ती जर का वाढवण्याचा प्रयत्न मी सोडणार असेल तर मी कशाला पक्षप्रमुख हवा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, या मुलाखतीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्यावरही भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले कि, गडकरी म्हणाले होते आमच्याकडे वॉशिंग मशिन आहे. लोकांना आमच्या पक्षात घेऊन आम्ही पुण्यवान करतो. आरोप असणारे त्यांच्या पक्षात गेल्यावर त्यांचं पुढे काय होणार आहे? शिवसेनेच्या ज्या नेत्यांना २४ तासात तुरुंगात जातील असे आरोप होत होते ते भाजपात गेल्यावर स्वच्छ झाले. नवनव्या लोकांना त्रास दिला जातोय. हे सशक्त राज्यकर्त्याचं लक्षण नाही, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!