लातूर: जिल्ह्यातील सिकंदरपुर तालुक्याचे सरपंच सौ. रेश्मा माधवराव गंभीरे यांनी गाव कोरोना मुक्ती साठी केलेल्या प्रयत्नांची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेऊन सरपंच गंभीरे यांनी कोरोना रुग्णांची माहिती तात्काळ होण्यासाठी गावात सुरू केलेल्या पुरुष व महिला व्हाट्सअप ग्रुप या अभिनव उपक्रमाच्या कामाचे विशेष कौतुक करून राज्यातील इतर ग्रामपंचायतीने देखील असा उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.
सिकंदरपुरच्या सरपंच गंभीरे यांनी कोरोना प्रतिबंधासाठी गावामध्ये ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी केली. गावातील आशा कार्यकर्त्या व ऑंटी कोरोना फोर्सचे सदस्य यांना सोबत घेऊन गावात घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधाच्या उपाय योजनांची माहिती देऊन त्यांचे प्रबोधन करण्यात केले. त्याप्रमाणेच ‘माझे गाव माझी जिम्मेदारी’ मोहीम गावात राबवून गावातील निराधार, अपंग तसेच विधवा लाभार्थ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार्याने त्यांचे अनुदान त्यांना घरपोच वाटप करण्यात आले, त्यामुळे गर्दी टाळण्यात यश मिळून संसर्ग होण्याचा अटकाव करण्यात आला, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबवून गाव व गावातील रस्ते पूर्णपणे स्वच्छ ठेवण्यात आले. गावात सोडियम हैपो क्लोराईडच्या फवारण्या करण्यात आल्या तसेच सर्व कुटुंबांना मास्क व सानीटायझर वाटप ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले, असेही श्रीमती गंभीरे यांनी सांगितले.
गावात एकाही व्यक्तीला कोरोना होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. जरी कोरोना झाला तरी कोरोना रुग्णांची माहिती तात्काळ मिळावी यासाठी गावातील सर्व महिला व पुरुष यांचे स्वतंत्र व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आले व या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या तसेच शेजारच्या कुटुंबात कोठेही संशयित रुग्ण आढळल्यास त्याची तात्काळ माहिती द्यावी, असे कळविण्यात आले. ही माहिती मिळाल्यानंतर तात्काळ संबंधित रुग्णावर योग्य ते उपचार करून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले. या व्हाट्सअप ग्रुप मुळे कोरोना रुग्णांची तात्काळ माहिती मिळत असल्याने व त्यांच्यावर आरोग्य विभागाच्या मार्फत तात्काळ उपचार करणे शक्य झाल्यामुळे आज गाव पूर्णपणे कोरोना मुक्त झाल्याची माहिती सरपंच गंभीरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.
सिकंदरपुर गाव कोरनामुक्त होण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पंचायत समिती व आरोग्य विभाग यांनी वेळोवेळी सहकार्य केले त्याबद्दल श्रीमती गंभीरे यांनी आभार व्यक्त केले तसेच गावच्या सरपंचांना थेट मुख्यमंत्री महोदय यांची बोलण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दलही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले व कोरोना मुक्तीच्या चळवळीत सिकंदरपुर गाव सक्रिय सहभाग घेईल, अशी ग्वाही देखील सरपंच गंभीरे यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- प्रशांत किशोर-शरद पवार यांची भेट भाजपसोबत शिवसेना आणि कॉंग्रेससाठी देखील धोक्याची घंटा ?
- ‘बाळासाहेब असते तर विमानतळाला नाव नाकारले असते!’, भुजबळांचा शिवसेनेला सल्ला
- ‘मी लठ्ठ असले तरीही…’, आपल्या लठ्ठपणावर बोलली विद्या बालन
- श्रीलंका दौऱ्यावर जाण्याआधी खेळाडूंना राहावं लागणार ‘इतके’ दिवस ‘क्वारंटाइन’
- आरक्षणावर नक्षल्यांची भूमिका जाहीर, ‘मराठा समाजातील दलाल नेत्यांपासून सावध राहा!’


