Share

संजय राठोड यांना पोलिसांकडून क्लिन चीट ; शरीरसुखाची मागणी केल्याचा तक्रार अर्ज खोटा

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते. राठोड वनमंत्री असताना शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार यवतमाळ पोलिसांकडे केली होती. या आरोपामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. परंतु आता याप्रकरणी पण, पोलीस तपासातून कोणतेही तथ्य समोर आले नाही. त्यामुळे पोलिसांनी संजय राठोड यांना क्लिन चीट दिली आहे.

पोलिसांना पाठवण्यात आलेल्या अर्जामध्ये महिलेच्या पतीचे नाव चुकलेले आहे. तसेच त्या अर्जावरील सही अर्जात नमुत केलेल्या महिलेची नाही. महिलेची राठोड यांच्याविषयी काहीही तक्रार नाही, असं पोलिसांनी सांगितलं आहे. विशेष चौकशी पथकाने केलेल्या चौकशी अंती माजीमंत्री व आमदार संजय राठोड यांच्याविरुद्ध करण्यात आलेला तक्रार अर्ज महिलेने स्वतः पाठविलेला नाही. या अर्जामध्ये महिलेच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. तसेच चौकशी पथकातील महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सदर महिलेची मनस्थिती ठीक असल्याची खात्री केली आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्या महिलेचे कॅमेरा विचारपूस करून बयाण नोंदविण्यात आलेला आहे.

अर्जावरील सही त्या महिलेची नाही. महिलेच्या पतीचे नावसुद्धा चुकीचे टाकलेले आहे. त्यामुळे महिलेच्या नावाने पाठवलेला अर्ज खोटा आहे. महिलेची आमदार संजय दुलीचंद राठोड यांच्याविषयी काही तक्रार नाही. नमूद महिलेच्या नावाने कुणीतरी खोडसाळपणे स्पीडपोस्टाने हा तक्रार अर्ज केल्याचे निष्पन्न झालेले आहे. अर्जात नमुद केलेल्या महिलेचा व महिलेच्या कुटुंबाचा तक्रार अर्जाशी काहीएक संबंध नाही, असे यवतमाळचे एसपी दिलीप पाटील यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!