🕒 1 min read
औरंगाबाद : राज्य शासनाच्या वर्ग-३ व वर्ग-४ च्या पदभरती परीक्षा देखील शासनानेच घ्याव्यात तसेच नुकत्याच झालेल्या पदभरती परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी दोषींवर कारवाई करून स्पर्धा परीक्षा ‘कोचिंग क्लासेस’ संदर्भात कठोर नियमावली तयार करावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण(Satish Chavan) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे(Udhav Thackrey), उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आ. सतीश चव्हाण यांनी बुधवारी (दि.१५) यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.
सार्वजनिक आरोग्य विभागापाठोपाठ आता म्हाडाच्या पदभरती परीक्षेचा देखील पेपर फुटल्याने तरूणांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शासनाने वर्ग-३ व वर्ग-४ च्या परीक्षा घेण्याची जबाबदारी खाजगी कंपन्यांना दिल्याने पेपरफुटीचे प्रकरण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना या खाजगी कंपन्यांवर विश्वास राहीला नसून प्रामाणिकपणे परीक्षेची तयारी करत नोकरीची आस लावून बसलेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा देखील कुठेतरी विचार झाला पाहिजे असे आ. चव्हाण यांनी निवेदनात म्हटले आहे. पेपर फुटीवर परीक्षा पुढे ढकलणे किंवा रद्द करणे हा पर्याय नाही.
राज्यात पदभरती परीक्षांमध्ये होणारी पेपरफुटी टाळायची असल्यास सर्व पदभरती परीक्षांची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घेणे अत्यंत गरजेचे आहे. तशी मागणी देखील आता सर्वच स्तरातून होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सर्व वर्गाच्या परीक्षा घेणे शक्य नसल्यास वर्ग-३ व वर्ग-४ च्या परीक्षा घेण्यासाठी राज्य सरकारने स्वत:ची एक नवी संस्था उभारावी व या संस्थेमार्फत या परीक्षा आयोजित कराव्यात जेणे करून परीक्षांमध्ये पारदर्शकता येऊन प्रामाणिकपणे अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांमध्ये सरकारप्रती विश्वासाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. शिवाय पेपर फुटी सारख्या गैरप्रकाराला देखील आळा बसेल असे आ. सतीश चव्हाण यांनी निवेदनात नमूद केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- विजय हजारे करंडक स्पर्धेतील चमकदार कामगिरीनंतर ऋतुराज गायकवाडची मोठी प्रतिक्रिया
- मनसेला खिंडार! पुण्यानंतर औरंगाबाद मनसेतही अस्वस्थता; या बड्या नेत्याचा पक्षाला रामराम???
- …आणि भारत सुद्धा जगाचा नकाशा बदलू शकतो हे संपूर्ण जगाला दाखवले- जितेंद्र आव्हाड
- जैसी करनी वैसी भरनी! कोहलीच्या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांना झाली अनिल कुंबळेची आठवण
- कोहलीच्या गौप्यस्फोटानंतर सलमान बट्टने साधला सौरव गांगुलीवर निशाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
