नांदेड: मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात हाणामारीच्या घटनेत वाढ झाली आहे. तालुक्यातील कुंटुर पोलीस स्टेशन अंतर्गत मेळगाव येथे ग्राम पंचायत निवडणुकीवरुन वाद उफाळला आहे. दोन गटात तुफान धुमश्चक्री उडाली.या प्रकरणी दोन्ही गटाच्या २१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या भांडणांचे मूळ कारण ग्रामपंचायत निवडणूक होय. मेळगाव येथील एका पार्टीचे ३ उमेदवार व दुसऱ्या पार्टीचे ३ उमेदवार निवडून आले होते. यामध्ये दोन उमेदवारांना समान मते पडल्याने टॉस करून निवडून आलेल्या उमेदवाराने ग्रामपंचायत ताब्यात घेतली. मात्र पडलेल्या उमेदवारांनी निवडून आलेल्या उमेदवाराच्या निवडणूक अर्जाची चौकशी लावली.
त्यामध्ये अतिक्रमण, शौचालय नसल्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीसाठी पंचायत समिती येथून गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विस्ताराधिकारी यांना पाठवून दिले. त्यावेळी ग्रामसेवक, विस्तार अधिकारी गावात येऊन चौकशी करत असताना उमेदवाराच्या घरासमोरील रस्त्यावर आलेल्या पायऱ्या तोडून टाकल्याचे दिसून आले.
याबाबत उमेदवाराला विचारणा केली असता मी अतिक्रमण केले नाही सर हे काढले आहे, असं दाखवल्यानंतर मनात राग धरून माझ्याविषयी तक्रार दिली म्हणून निवडून आलेल्या उमेदवाराने सदर गैरकायद्याची मंडळी जमवून हाणामारी केली. ही घटना २१ एप्रिल रोजी सकाळी घडली. या प्रकरणी कुटुर पोलीस ठाण्यात गुरनं ८०/२१ दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- बर्थ डे स्पेशल; ‘शिवाजी पार्क ते वानखेडे’ सचिनचा २२ यार्डचा प्रवास बनला ३ पिढ्यांचे प्रेरणास्थान
- निराश कर्णधार रोहितने मधल्या फळीवर फोडले पराभवाचे खापर
- सलग तीन पराभवानंतर पंजाबची गाडी विजयी ट्र्रॅकवर, ९ गडी राखुन मुंबईचा केला पराभव
- ऑक्सिजन प्लांटसाठी परभणी जिल्हाधिकारी यांची समिती वैद्यकीय सुविधांवर लक्ष देणार
- मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
