Share

अबब ! मुश्रीफ आणि त्यांच्या जावयाने केला तब्बल १५०० कोटींचा घोटाळा; सोमय्यांचा दावा

Published On: 

कोल्हापूर : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. यापार्श्वभूमीवर सोमय्या आज म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी कोल्हापुरात दाखल झाले आहेत. त्यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेत कोल्हापूरच्या दौऱ्याची सुरुवात केली आहे.

दरम्यान, सोमय्या हे मुरगूड पोलीस ठाण्यात मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मुश्रीफ यांच्या घोटाळ्याबाबत सोमय्या यांनी पुरावे पोलिसांकडे सुपूर्द केले आहेत. यानंतर मुरगूड येथे सोमय्या यांनी पत्रकार परिषदेतून महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

हसन मुश्रीफ यांनी त्यांचा जावयाशी मिळून १५०० कोटी रुपयांचा घोटाळा केला. ही कला पण एक वेगळीच कला आहे.मुश्रीफ यांनी स्वतःच्या ग्रामविकास खात्याचे टेंडर हे स्वतःच स्वतःच्या जावयाच्या कंपनीला दिलं. ज्या कंपन्या अस्तित्वात नाहीत त्या कंपनीतून पैसे आले. हे सरकार खिसेकापू आहे. मोदी सरकारने ग्रामपंचायत ना थेट पैसे देण्याचा निर्णय घेतला. पैसे थेट जातात पण ठाकरे सरकारच्या ग्रामविकास मंत्र्यांनी ऑर्डर दिल्या की तुमचे टॅक्स रिटर्न, जीएसटी रिटर्न, टीडीएस रिटर्न मी सांगणार ती कंपनी देणार. त्यांना मी सांगेल ती किंमत द्यायची. ग्रामपंचायतीच्या खिशात जाणारे पैसे मागच्या दरवाजातून मुश्रीफ यांच्या खिशात गेले’ असं भाष्य करत यातून हा सारा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!