नाशिक – नाशिक इथल्या महापालिकेच्या डॉक्टर झाकीर हुसेन कोविड रुग्णालयात काल दुपारी झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे; प्राणवायूअभावी मृत्यु पावलेल्या रुग्णांची संख्या 24 झाली आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येनं रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे.
राज्य सरकारनं या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. ऑक्सिजनच्या टाकीत द्रवरूप ऑक्सिजन भरताना नोझल तुटल्याने ही वायू गळती झाली. अग्निशमन दलाचं पथक तातडीने दाखल झालं; पण प्राणवायू कमी पडल्याने 24 रुग्ण मृत्यूमुखी पडले. जिल्हा शासकीय रुग्णालयाने 15 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर पाठवल्याने अन्य रुग्णांचे प्राण वाचले.
या घटनेबाबत सर्वच स्तरांतून संताप व्यक्त होत आहे. ‘नाशिकमध्ये घडलेली दुर्घटना अंगावर शहारा आणणारी आहे. काय आणि कशाची शिक्षा आपण भोगतोय’, असा सवाल दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी केला आहे. समीर यांनी ट्विट करत दुर्घटनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली.
नाशिकमध्ये घडलेली दुर्घटना अंगावर शहारा आणणारी आहे. काय आणि कशाची शिक्षा भोगतोय आपण?! आणि इतकी?!
आता बास!!! खरंच बास!!!
????????????— Sameer Vidwans । समीर विद्वांस (@sameervidwans) April 21, 2021
याप्रकरणी भद्रकालीचे वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे यांनी रुग्णाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाची फिर्याद दाखल केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी घटनास्थळाची पाहणी करीत दोषींवर कारवाइच्या सूचना दिल्या होत्या. तसेच ७ जणांची समिती नेमून घटनेची चौकशी सुरू केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- शासनाच्या नव्या निर्बंधांमुळे लग्न करू इच्छिणाऱ्या मंडळींची होणार पंचाईत, जाणून घ्या नवी नियमावली
- ‘माझ्याकडेही त्यांच्या अनेक प्रकरणांचं मटेरियल तयार आहे, ते बाहेर काढावं लागेल’
- राज्याला २६ नव्हे तर ५० हजार दिवसाला रेमडेसिवीर इंजेक्शन द्या – नवाब मलिक
- महाराष्ट्राचा असा छळ कश्यासाठी ? जितेंद्र आव्हाड यांचा संतप्त सवाल
- पाकिस्तानात आलिशान हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट, चिनी राजदूताला मारण्याचा होता डाव ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

