Share

अनलॉक होताच नागरिकांना नियमांचा विसर! जागोजागाी ट्राफिक जॅम

Published On: 

औरंगाबाद : शहर शासन अनलॉक प्रमाणे पहिल्या स्तरावर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील मुख्यबाजारपेठेत जास्त प्रमाणात गर्दी होत आहे. त्यात छोट्या रस्त्यांवर कार, जीप यांसारख्या गाड्या येत असल्यामुळे वन वेची पर्वा न करता वाहनधारक आपल्या गाड्या बिनधास्त नेत आहे. परिणामी अनेक ठिकाणी तासनतास ट्राफिक जॅम होत आहे, त्यामुळे नागरिक वाहतुकीचे नियम विसरले कि काय असा प्रश्न निर्माण होत आहे.

औरंगपुरा, गुलमंडी, सिटी चौक, शाहगंज, जुना बाजार, पैठण गेट इ. भागात लोकांची गर्दी मोठ्याप्रमाणात होती. तब्बल ८० ते ८५ दिवसानंतर खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांसह वाहनांच्या या भागात रांगा लागल्या होत्या. जुन्या बाजारपेठेत बहुतांश रस्ते हे वन वे आहे. अनलॉकच्या पहिल्या दिवशी अनेक नागरिकांना याचा विसर पडला होता. विशेष म्हणजे वन वे असलेल्या रस्त्यांवर एकही वाहतूक पोलीस हजर नव्हता. परिणामी अनेक भागात तासंतास वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

सकाळी दहा वाजेपासून बाजारपेठेत नागरिकांची रेलचेल मोठ्या प्रमाणात वाढली होते. दुपारी तीन पर्यंत अनेक नागरिकांना ट्राफिक जॅमचा सामना करावा लागला. मात्र, साडेतीनच्या दरम्यान पावसाचे जोरदार आगमन झाले. त्यामुळे बाजारपेठेत असलेल्या नागरिकांची रेलचेल काही प्रमाणात थांबली. अनलॉक होताच नागरिकांना वाहतूक नियमांचा विसर पडला कि काय, अशी चर्चा बाजारपेठेतील व्यापारी तसेच नागरिक करत होते. दररोज अशीच परिस्थिती राहिली तर १० मिनिटांच्या कामासाठी नागरिकांना तासंतास वाहनांच्या रांगेत उभे राहावे लागेल. यासाठी वाहतूक पोलिसांनी यात लक्ष घालण्याची मागणी जोर धरत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!