मुंबई : देशात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वांसाठी लसीकरण सुरु करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. अशातच अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण होत आहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचं सरसकट मोफत लसीकरण केलं जाणार आहे. तब्बल ५ कोटी ७१ लाख जनतेचं मोफत लसीकरण केलं जाणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मात्र, राज्याला मिळणारा लसींचा साठा तसेच ४५ वर्षांपुढील नागरिकांच्या दुसऱ्या डोसची जोडणी यामुळे १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यास राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी असमर्थता दर्शवली आहे. राज्य सरकार मुबलक लसींच्या साठ्यासाठी प्रयत्नशील आहे. विदेशातून लस आयात करण्यासाठी केंद्राने सहकार्य करावं. लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी व आवश्यक साठ्याची जोडणी झाल्यानंतरच महाराष्ट्रात १८ वर्षांपुढील नागरिकांचं लसीकरण सुरु केलं जाईल असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
त्यामुळे सध्या Cowin वा आरोग्यसेतूद्वारे नोंदणी करूनही स्लॉट बुकिंग करता येत नसल्याचं समोर येत आहे. तरुणवर्गाचा उत्साह चांगला आहे मात्र आणखी काही दिवस संयम बाळगावा असं आवाहन देखील टोपेंनी केल्यानंतर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील याबाबत भाष्य केलं आहे. ‘राज्य सरकार साठ्याची जुळवाजुळव करत आहे. आवश्यक साठा झाल्यानंतर १५ मे नंतर १८ वर्षांपुढील नागरिकांचं लसीकरण करण्यास प्रारंभ होऊ शकतो. सध्या ४५ वर्षांपुढील नागरिकांच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य दिलं जात आहे,’ असं भाष्य पेडणेकर यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- एसपी साहेब उपचारासाठी एक रुपया नाही; मदतीसाठी आर्त हाक देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
- जालना जिल्ह्यातील १७० गरोदर मातांना कोरोनाची बाधा
- अबब! एकाच कसोटी सामन्यात १३०० धावा
- ‘मोदींच्या मुत्सद्दीपणामुळे विदेशातून मदतीचा ओघ’, देवेंद्र फडणवीस यांचा दावा
- आईच्या मृतदेहाजवळ २ दिवस उपाशी राहिलेल्या बाळाला दिघी पोलिसांनी भरवला मायेचा घास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

