Share

नागपूर-मुंबई महामार्गावर वाळूमाफिया-शासकीय कर्मचाऱ्यांचा सिनेस्टाईल थरार!

Published On: 

औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून तालुक्यातील भगूर फाट्यानजीक उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाच्या ताब्यातील वाळूचे ट्रॅक्टर माफियांनी हिसकावून नेल्याची घटना ताजी असतानाच माफियांनी पुन्हा शासकीय कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि. १०) तालुक्यातील जळगाव शिवारात घडली. दोघाही कर्मचाऱ्यांनी वेळीच सावधानता राखल्याने मोठा अनर्थ टळला.

गेल्या काही दिवसांपासून माफियांनी वाळूपट्टयात धुमाकूळ घातला आहे. विशेषतः गोदाकाठच्या गावांतील पात्रांसह शिवना नदीच्या पात्रात वाळूमाफियांचा हैदोस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांच्या आदेशानुसार कारकून दीपक त्रिभुवन व महेश शिंदे हे तालुक्यातील जळगाव येथे अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेले. या दोघांनीही रस्त्यावर दुचाकी आडवी उभी करून   चालकास वाहन थांबविण्यास सांगितले.

यावेळी चालकाने थेट त्यांच्या अंगावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न केला. परंतु कर्मचारी प्रसंगावधान राखत कसेतरी बचावले. परंतु कर्मचाऱ्यांनी हिंमत न हारता दुचाकीवरून त्या टिप्परचा तब्बल १० किलोमीटर पाठलाग करून अखेर त्याला नागपूर-मुंबई महामार्गावरील करंजगाव नजीक असलेल्या परसोडा फाट्यावर पकडले व उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या एका चालकास बोलावून ते वाहन ताब्यात देऊन सरळ ते वैजापूर पोलिसांच्या  हवाली करण्यात आले.

टिप्परचा मालक अमोल निघोटे हा तेथे आला असता कर्मचाऱ्यांनी त्याला वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत चौकशी केली असता त्याच्याकडे कोणतीही कागदपत्रे नव्हती. याशिवाय वाहनाच्या मागे अथवा पुढे क्रमांकही लिहिलेला नव्हता.  दरम्यान या घटनेनंतर तालुक्यातील करंजगाव येथील   तलाठ्यास बोलावून पंचनामा केला. वाहनामध्ये दोन ब्रास वाळू आढळून आली. त्यामुळे बाजार भावाच्या पाचपटीनुसार अमोल निघोटे याला २ लाख ७२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!