Share

‘विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालण्याइतपत राज्य सरकार बेपर्वा झालेय’, भाजपची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : १७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्यासंदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला होता. राज्यातील कोरोना संसर्ग कमी झालेल्या भागातील निर्बंध शिथील केल्यानंतर सरकारचा हा निर्णय महत्वाचा मानला जात होता. मात्र आता या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. यावर अनेक राजकीय पक्षांने निशाणा साधला आहे.

भाजपने या मुद्द्यावर ठाकरे सरकारवर सोशल मीडियाद्वारे टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणले, दुकाने, हॉटेल, रेल्वेप्रवासावर बंदी घालताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टास्क फोर्सच्या नकारघंटेचे कारण देतात. पण शाळांबाबत सरकारने टास्क फोर्सशी चर्चाच केली नाही. अखेरीस शाळा उघडण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. मुलांचा जीव धोक्यात घालण्याइतपत सरकार बेपर्वा झाले आहे.’ असे ते म्हणाले.

दरम्यान, इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग आणि शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली होती. त्यावेळी जरी करण्यात आलेल्या शासन नियमात म्हटले आहे कि, राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग व शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12वी चे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेवून शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. मात्र या सर्व निर्णयांना तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!