Share

‘…याची उत्तरे द्या अन्यथा राजीनामा द्या’, पडळकरांचे मंत्री वड्डेटीवारांना पत्र

Published On: 

🕒 1 min read

सांगली : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाज्योतीची स्थापना होऊन तात्काळ ३८० कोटींचा निधी मंजूर झाला. पण महाविकास आघाडी सरकार आता केवळ भटके-विमुक्त, ओबीसींच्या पदरात फक्त मोठ्या घोषणांचा पाऊसच पडतोय, अशी टीका भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. भटके-विमुक्त, ओबीसींच्या प्रश्नांसंदर्भात पडळकर यांनी राज्याचे मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वड्डेटीवार यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात पडळकर यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली.

महाराष्ट्रात भटका विमुक्त समाज ५२ टक्के आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांकडून या समाजाला दुय्यम वागणूक मिळत आहे. महाज्योतीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींच्या विकासासाठी काहीच काम केले नाही. त्यांच्यामुळे महाज्योतीचे वाटोळे झाले, असा गंभीर आरोप पडळकर यांनी केला आहे. ओबीसी, मदत आणि पुर्नवसन आणि चंद्रपूरचं पालकमंत्रीपद अशे तीन-तीन पदं भूषवूणही विजय वडेट्टीवारांना महाज्योतीचं पद कशाला मिरवायचे आहे? नागपूरपासून १५० किलोमीटर दूर असणाऱ्या गोंदीया जिल्ह्यातला अधिकारी प्रदीप डांगेला महाज्योतीचा अतिरिक्त कार्यभार नेमका दिलाय का? आणि कशासाठी? असे सवाल त्यांनी उपस्थित केले.

घोषणा करून वडेट्टीवारांनी फक्त तोंडाची वाफ केली आणि या ‘घोषणाबहाद्दर कारभारामुळे’ महाज्योती संस्थेचे सतत धिंडवडे निघत आहेत. अंमलबजावणी शुन्य असतानाही आपण आपल्या प्रसिद्धीसाठी दोन कोटी रूपयांचा निधी खर्च केलाच कसा? मग तरीही आपण कोणत्या नैतिकतेने या खात्याचं मंत्रीपद आपल्याकडं ठेवलं आहे? याचे उत्तर द्या नाहीतर राजीनामा द्या, अशी मागणी पडळकर यांनी केलीय.

१० हजार विद्यार्थ्यांना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देऊ, युपीएससीच्या विद्यार्थ्यांना खासगी संस्थेत प्रशिक्षण देऊ, उच्चशिक्षणासाठी ३१ हजारांची फेलोशिप देऊ, ओबीसींसाठी ७२ वसतिगृह उभारू, नीट-सीईटीसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन ट्रेनिंग देऊ, नाशिक-औरंगाबादमध्ये उपविभागीय कार्यालये उभारू, या आश्वासनांचे नेमके काय झाले? असा सवालही आमदार पडळकर यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!