🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री तापसी पन्नू ही बॉलीवूडमधील लोकप्रीय अभिनेत्रीपैकी एक म्हणून ओळखली जाते. गेल्या काही काळापासून वेगवेगळ्या विषयावर चित्रपटाद्वारे तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. काही दिवसापूर्वीच तिचा ‘हसीन दिलरुबा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर आता लवकरच तापसी पन्नू ‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दिग्दर्शक आकाश खुराना यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. रश्मी रॉकेट हा चित्रपट निर्मात्यांनी ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हंटले जात आहे. परंतु याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
https://www.instagram.com/p/CHWwvoXpFvU/?utm_source=ig_embed&ig_rid=89f75bff-cd90-4d4d-8175-f756037d1dd1
तापसी पन्नू हिची भूमिका असलेल्या ‘रश्मी रॉकेट’ चित्रपटाची कथा एका गावातील मुलीची आहे. वेगात धावण्यासाठी ईश्वराचे तिला वरदान मिळाले आहे. या अतुलनीय क्षमतेमुळे गावकरी तिला रॉकेटच्या नावाने ओळखतात. जेव्हा तिला व्यावसायिकदृष्ट्या आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते, तेव्हा ती ही संधी तिच्या हातातून जाऊ देत नाही. फिनिश लाइनपर्यंत धावण्यात अनेक अडथळे आहेत, याची तिला जाणीव होते. अ;ॅथलेटिक स्पर्धेसारखी दिसणारी ही शर्यत, सन्मान, आदर आणि अगदी स्वतःच्या ओळखीसाठी वैयक्तिक लढाईत रुपांतरित होते.
‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटाचे नुकतेच चित्रीकरण पूर्ण झाले आहे. या चित्रपटातील फर्स्ट लूकमध्ये तापसी रनिंग ट्रॅकवर पाठमोरी उभी असल्याचे दिसत आहे. आपल्या जिद्दीच्या व मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचणाऱ्या एका धावपटूची भूमिका ती साकारणार आहे. तिच्या या चित्रपटाची अनेक चाहत्यांना उत्सुकता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज्यसभेत महिला खासदारांना मारहाण, ही लोकशाहीची हत्या’,राहुल गांधींचा आरोप
- ताटं वाजवल्यामुळेच देशात अवदसा आली; मोदी माध्यमांसमोर यायला घाबरतात – प्रणिती शिंदे
- ऐतिहासिक महेमूद दरवाजा लगतच्या अतिक्रमण धारकांना २४ तासांची मुदत
- मंत्रिमंडळ बैठकीत ठरलं ; राज्यातील हॉटेल्स, मॉल्स रात्री 10 पर्यंत सुरु राहणार
- Eng vs Ind : काही वेळातच दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात ; दोन्ही संघ ‘या’ मोठ्या बदलांसह उतरणार मैदानात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
