Share

सिगारेट पडली महागात! श्रीलंकेच्या त्या खेळाडूंवर निलंबनासह दंडाची कारवाई

Published On: 

मुंबई : श्रीलंकेचा संघ हा सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. गेल्या काही दिवसापासुन सुरु असलेली श्रीलंकेच्या अपयशाची मालिका या दौऱ्यावर सुरुच आहे. यात भर म्हणून श्रीलंकेच्या काही खेळाडूंनी बायो बबलचे उल्लंघन केले होते.

कुशल मेंडिस, निपोशेन डिकवेला आणि धनुष्का गुणतिलका या तीन खेळाडूंनी बायो बबलच्या नियमाचा भंग केल्यामुळे या खेळांडुवर एक वर्षाच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. येत्या एक वर्षासाठी ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळु शकणार नाही. तसेच यांच्यावर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आली आहे. मात्र दंडाची रक्कम किती हे समजु शकले नाही. इंग्लंडविरुद्धच्य तीसऱ्या टी-20 सामन्यानंतर हे तिनही खेळाडू हॉटेलमधुन सिगारेट पिण्यासाठी बाहेर पडले होते.

हा प्रकार उघडकीस येताच श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या तिन्ही खेळाडूंवर कडक कारवाई केली आणि तिघांना मायदेशी परत बोलावलं. आता या खेळाडूंचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. निलंबनाशिवाय खेळाडूंना मोठा दंडही लावण्यात आला आहे, पण दंडाची रक्कम किती आहे, याबाबत अजून माहिती मिळू शकलेली नाही. निलंबनामुळे आगामी भारताविरुद्धच्या मालिकेतही हे खेळाडू खेळणार नाहीत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!