शारजाह : आयपीएलचे विजेतेपद मिळविण्यासाठी आता चार संघांचं स्थान निश्चित झालं असून ते जोर लावताना दिसत आहेत. आयपीएल प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवणायसाठी मुंबई इंडियन्स वगळता इतर संघांना यंदा चांगलाच संघर्ष करावा लागला. आयपीएल अंतिम वळणावर आली असतानाच क्रिकेट क्षेत्रातील वातावरण चांगलंच तापलं आहे.
या परिस्थितीला आयपीएलमधील चुरशीसह अन्य एक कारण आहे. कोरोनाकाळात तब्बल ८ महिने भारतीय संघाने कोणताही दौरा केलेला नाही अथवा क्रिकेट सामना खेळलेला नाही. बीसीसीआयने अथक प्रयत्न करून आयपीएल युएईमधील देशात भरवली असून काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची घोषणा केली गेली.
या दौऱ्याच्या घोषणेनंतर टीम निवडीवरून क्रिकेटप्रेमींसह अनेक माजी खेळाडू व क्रिकेटतज्ञांनी टीकास्त्र सोडलं आहे. भारतीय संघाचा उपकर्णधार आणि हिटमॅन रोहित शर्मा याला देखील या टीम मधून डावलण्यात आल्याने भलताच संताप व्यक्त केला जात आहे. आयपीएलमधील सामन्यावेळी गुडघ्याचे स्नायू दुखावल्याने रोहित शर्मा आयपीएलमधील चार सामने खेळला नव्हता. त्यामुळे रोहितची दुखापत गंभीर असावी, असे तर्क लावत निवड समितीने त्याच्या निवडीवर सावध भूमिका घेऊन प्रतिक्षेची भूमिका घेतली असली तरी केएल राहुलला उपकर्णधार करण्याची घाई कसली होती, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दरम्यान, या सर्व वादावर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याने देखील भाष्य केलं आहे. “रोहित नक्कीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार. रोहित शर्मा आणि इशांत शर्मा या दोन्ही खेळाडूंवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. इशांत शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी दिली नाही. मात्र तरीही तो कसोटी मालिकेत खेळू शकतो. तसेच रोहितला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना पाहायचेय. रोहित दुखापतीतून सावरल्यास, निवड समिती रोहितबाबत नक्कीच सकारात्मक विचार करेल, असं गांगुली म्हणाला आहे.
मी हॅमस्ट्रिंग दुखापतीमधून बरा झालो आहे – शर्मा
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामन्यात रोहितने पुनरागमन केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, हॅमस्ट्रिंग दुखापतीमधून मी आता पूर्णपणे बरा झालो आहे. दुखापतीमुळे दोन आठवड्याच्या ब्रेकनंतर मैदानावर परतल्याने मी आनंदी आहे. मैदानावर खेळण्याचा आनंद वेगळा असतो. काही सामने खेळायचे आहेत आणि त्यानंतर बघू कसे काय होते. हॅमस्ट्रिंग आता पूर्णपणे बरे झाले आहे, असा खुलासा खुद्द रोहित शर्माने केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- खडसे समर्थकांची भाजपमधून गळती सुरूच; पुण्यातील ‘या’ महिला नेत्याने दिला राजीनामा
- अर्णब वरील कारवाई ही महाविकास आघाडीने अन्वय नाईकांना वाहिलेली श्रद्धांजली! – सचिन सावंत
- अलका ताई वयाने ज्येष्ठ आहेत, त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर होता व आजही आहे
- महाराष्ट्रातील पप्पू सरकार कोणाकोणाचा आवाज दाबणार? ; कंगणाचा घणाघात
- लोकशाहीचा आजचा काळा दिवस! गोस्वामीच्या अटकेनंतर आशिष शेलारांची बोचरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
