Share

आयपीएल २०२२ मध्ये ‘या’ खेळाडूला कोणत्याही संघाने केले नाही खरेदी; आता इंग्लंडमध्ये पाडतोय धावांचा पाऊस

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात ऑस्ट्रेलियन फलंदाज ख्रिस लिनला कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते. तो सध्या इंग्लंडच्या टी-२० स्पर्धा व्हिटॅलिटी ब्लास्टमध्ये बॅटने धावांचा पाऊस पडत आहे. नॉर्थम्प्टन शायरकडून खेळणाऱ्या लिनने वूस्टर शायरविरुद्ध केवळ ५७ चेंडूत नाबाद ११३ धावा केल्या. यासह त्याने टी-२० क्रिकेटमधील त्याच्या सर्वोत्तम धावसंख्येची बरोबरी केली. टी-२० ब्लास्टच्या या मोसमात लिनच्या बॅटमधून चौथ्या सामन्यातील हे दुसरे शतक आहे. लिनने त्याच्या धडाकेबाज फलंदाजीने विरोधी संघावर वर्चस्व गाजवले आहे. ११३ धावांच्या खेळीत या ऑस्ट्रेलियन फलंदाजाने ८ चौकार आणि ९ षटकार मारले. त्याने फक्त चौकार आणि षटकारांसह ८६ धावा फटकावल्या.

ख्रिस लिनच्या या खेळीच्या जोरावर नॉर्थम्प्टन शायरने २० षटकांत ३ गडी गमावून २२० धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना वूस्टर शायरचा संघ १६.४ षटकांत १४७ धावांत सर्वबाद झाला आणि नॉर्थम्प्टन शायरने ७३ धावांनी सामना जिंकला. नॉर्थम्प्टन शायरचा या मोसमातील हा सलग तिसरा विजय आहे. या सामन्यात आधी खेळताना नॉर्थम्प्टन शायरची सुरुवात चांगली झाली नाही. संघाचा सलामीवीर बेन करण एक धाव काढून बाद झाला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेल्या ख्रिस लिनने दुसऱ्या गड्यासाठी जोश कॉबसोबत ६२ चेंडूत ११५ धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. कॉबनेही ३० चेंडूत ३० धावा केल्या.

लिनच्या टी-२० ब्लास्टमध्ये सर्वाधिक धावा

याआधी डर्बीशायरविरुद्धच्या सामन्यात ख्रिस लिनला खातेही उघडता आले नव्हते . वूस्टरशायरविरुद्ध त्याने धडाकेबाज शतक ठोकून पुन्हा लय शोधली आहे. लिनने टी-२० ब्लास्टच्या या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ७ सामन्यात १६६ च्या स्ट्राईक रेटने आणि ९५ च्या सरासरीने ३७८ धावा केल्या आहेत. त्याने दोन शतके आणि दोन अर्धशतके केली आहेत. लिन दोन्ही शतकी खेळींमध्ये नाबाद परतला आहे. आयपीएल २०२२ मध्ये खरेदीदार न मिळण्यासोबतच बिग बॅश लीगमध्येही तो निराश झाला. बिस्ब्रेन हीट संघाने त्याचा करार वाढवला नाही. पण टी-२० ब्लास्टमध्ये लिन ज्या प्रकारे बॅटने धावा काढत आहे त्यामुळे आगामी काळात फ्रँचायझी क्रिकेटमध्ये त्याची मागणी वाढू शकते आणि तो ऑस्ट्रेलिया संघातही पुनरागमन करू शकतो.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!