मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका त्यांच्यातील टी-२० मालिकेचा पहिला सामना गुरुवारी खेळला गेला. दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने २१२ धावा केल्या. एवढी मोठी धावसंख्या उभी केल्यानंतर असे वाटत होते की कदाचित भारतीय संघ सामना जिंकेल कारण ही धावसंख्या गाठणे तितके सोपे नव्हते. मात्र, दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज डेव्हिड मिलर आणि व्हॅन डर ड्युसेन यांनी ही आशा पूर्णपणे धुडकावून लावली आणि आपल्या संघाला ५ चेंडू शिल्लक असताना ७ गडी राखून विजय मिळवून दिला.
या सामन्यात डुसेनने किलर मिलरपेक्षा मोठी खेळी खेळली, पण डेव्हिड मिलरला सामनावीराचा किताब देण्यात आला. कारण मैदानात फलंदाजीस उतरताच त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी करण्यास सुरुवात केली त्याचा सांगायला मोठा फायदा झाला. त्याच्या या खेळीवरून त्याला आयपीएल २०२२ मध्ये खेळण्याचा किती फायदा झाला हे स्पष्ट दिसत आहे. मिलरला आक्रमक फलंदाजी करताना पाहून डुसेननेही आपला गियर बदलला आणि मोठी खेळी खेळली.
सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ८१ धावांत ३ गडी गमावले होते. परंतु त्यानंतर मिलर आणि ड्यूसेन पूर्णपणे खेळपट्टीवर स्थिरावले आणि दोघांनी चौथ्या गड्यासाठी नाबाद १२९ धावांची भागीदारी केली. या दोघांच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिका संघाला सहज विजय मिळवता आला. डुसेनने ४६ चेंडूत ५ षटकार व ७ चौकारांच्या मदतीने नाबाद ७५ धावा केल्या, तर मिलरने ३१ चेंडूत ५ षटकार व ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ६४ धावा केल्या. भारताने विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य दिले होते. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी १९.१ षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले आणि दक्षिण आफ्रिकेने ७ गडी राखून विजय मिळवला.
Simply sensational ????#INDvSA #BePartOfIt pic.twitter.com/UWJsxRWuLq
— Proteas Men (@ProteasMenCSA) June 9, 2022
डेव्हिड मिलरला त्याच्या खेळीसाठी सामनावीराचा किताब देण्यात आला. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिलरने हा सामनावीर म्हणून पुरस्कार पटकावण्याची ही ८वी वेळ होती. याआधी दक्षिण आफ्रिकेकडून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा किताब जिंकण्याचा विक्रम एबी डिव्हिलियर्सच्या नावावर होता. आता डेव्हिड मिलरने एबी ला मागे टाकले आहे. मिलर दक्षिण आफ्रिकेसाठी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा किताब जिंकणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

