🕒 1 min read
मुंबई : मुंबई पोलिसांनी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यावर लैंगिक छळ, पाठलाग आणि मारहाणीच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल केलं आहे. गणेश आचार्य यांच्यावर त्यांच्या एका को-डान्सरने आरोप केले होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे. या प्रकरणाचा तपास करणारे ओशिवराचे पोलीस अधिकारी संदीप शिंदे यांनी म्हटलं आहे, अंधेरी येथील संबंधित महानगर दंडाधिकारी न्यायालयात नुकतंच आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.
गणेश आचार्य आणि त्याच्या सहाय्यकाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 354-A (लैंगिक छळ), 354-C (स्टारिंग), 354-डी (लैंगिक छळ प्रकरण) , 509 (कोणत्याही महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान करणे), 323 (दुखापत करणे), 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान करणे), कलम 506 (गुन्हेगारी धमकी) आणि 34 (गुन्हा करण्याचा सामान्य हेतू) या सर्व आरोपांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
35 वर्षीय को-डान्सरने सांगितलं की, ”तिला पोलिसांनी आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचं म्हटलं आहे. गणेश आचार्य यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. अनेक सहकर्मचाऱ्यांनी यापूर्वीही गणेशवर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. गणेशने त्यांना वारंवार नाकारलं असून सर्व आरोप खोटे आणि निराधार म्हटलं आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, ‘गणेश आचार्यने तिला कथितरित्या सांगितलं की, जर तिला यशस्वी व्हायचं असेल तर मे 2019 मध्ये तिला त्यांच्यासोबत सेक्स करावं लागेल. तिने नकार दिला आणि सहा महिन्यांनंतर इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन कोरिओग्राफर असोसिएशनने तिचं सदस्यत्व रद्द केलं
महत्वाच्या बातम्या :
CRZ चे नियम धाब्यावर बसवत गिरगाव चौपाटीवर व्हिवींग गॅलरी; नितेश राणेंचा आयुक्तांना इशारा
“…पण वराती मागून घोडं आलं तर उपयोग काय?”, भातखळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा
भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधत अमोल मिटकरींनी दिल्या ‘एप्रिल फुल’च्या हटके शुभेच्छा
राज्यातील महिलांसाठी ‘तुमची अब्रू तुमची जबाबदारी’ हे धोरण आहे काय?; चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर निशाणा
ट्वीटरवर होतोय ‘BoycottHimalaya’ ट्रेंड; नेमके कारण काय?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
