🕒 1 min read
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाडवा मेळाव्यात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या शिवीगाळ भाषेवरून टीका केली होती. वर्तमानपत्राचा संपादक पत्रकार परिषदेत येऊन भ, चु शब्द वापरतो. अंगाशी आलं म्हणून हे होतंय. यांच्यासाठी आमच्या आजोबांनी शब्द काढला होता. हे सगळे ‘लवंडे’ म्हणजे काय? पूर्वी जेवायला पत्रावळ्या असायच्या. त्यातला द्रोण वरण-आमटी पडली की लवंडायचं. तसे हे लवंडे अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. आता मनसेनी पुन्हा एकदा फेसबुक पोस्ट करत संजय राऊत यांना डिवचले आहे.
मनसेनी त्यांच्या अधिकृत फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. ज्यात म्हटले आहे की, “… म्हणून श्री. संजय राऊतांना राजसाहेब ‘लवंडे’ म्हणतात! स्वर्गीय बाळासाहेबांची मशिदीवरील भोंग्या बाबतीतील चित्रफीत पाहिल्यावर आपली बोलती बंद झाल्याने ‘मला बाळासाहेबांचे पूर्वीचे व्हिडिओ दाखवून प्रश्न विचारू नका’ असे पत्रकारांना श्री. संजय राऊत म्हणाले. म्हणजे हे ‘महाशय’ स्वतःला बाळासाहेबांपेक्षा मोठे समजायला लागले आहेत का?”, असा सवालही मनसेनी केला आहे.
https://fb.watch/cwHsOzPpBC/
दरम्यान राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पुण्यातील पत्रकार परिषदेतून दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. 1 मे रोजी औरंगाबादेत जाहीर सभा घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच 5 जून रोजी ते अयोध्येचा दौराही करणार आहेत. त्यामुळे आता राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- राज्य नेमके किती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री मिळून चालवत आहेत?; ‘त्या’ प्रकरणावरून भातखळकरांचा टोला
- “कुणाला वाटत असेल द्वेषाच्या चिखलात सत्तेचं कमळ फुलेल पण…”, रोहित पवारांचा विरोधकांवर निशाणा
- ST कर्मचाऱ्यांची कुटुंबे आता सदावर्ते पोसणार आहे काय?; संजय राऊतांचा सवाल
- “…आणि ‘लाल परी’ मुक्त झाली! गाढवांचे काय?”, ‘सामना’तून संजय राऊतांचा प्रहार
- “५ कोटी द्या; अन्यथा बलात्काराची तक्रार दाखल करणार”, धनंजय मुंडेंना महिलेची धमकी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
