Share

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील लॉकडाउन ३१ मार्चपर्यंत

Published On: 

नांदेड : मागील महिन्यातील तिसऱ्या आठवड्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नांदेड येथील स्वामी रामनंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील लॉकडाउन हे ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आले आहे. कोव्हीड-१९ व्हायरसच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.

या लॉकडाउनमध्ये विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये, विद्यापीठ परिसरातील सर्व शैक्षणिक संकुले, प्रशासकीय विभागांना हा नियम लागू राहील. तसेच लातूर व परभणी जिल्ह्यातील उपपरिसर तर हिंगोली येथील न्यू मॉडेल डिग्री महाविद्यालय आणि किनवट येथील कै. श्री. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र यांनाही हा नियम लागू राहील. या दरम्यान महाराष्ट्र शासनाने कोव्हीड-१९ संदर्भात दिलेले सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे, असे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांनी सांगितले.

या दरम्यान नांदेड जिल्ह्यात १२८ नवे कोरोनाबाधीत नवे रुग्ण आढळले आसुन जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ही आता २४ हजाक १५९ इतकी झाली आहे. तर कोरोना विषाणुमुळे ६०४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर शुक्रवारी ९६ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली एकूण २२ हजार ६१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!